स्टार कॉलेज स्कीम अंतर्गत महात्मा फुले महाविद्यालयास अनुदान प्राप्त

स्टार कॉलेज स्कीम अंतर्गत महात्मा फुले महाविद्यालयास अनुदान प्राप्त

स्टार कॉलेज स्कीम अंतर्गत महात्मा फुले महाविद्यालयास अनुदान प्राप्त

विठ्ठल ममताबादे

उरण – पनवेल येथील महात्मा फुले कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयास नुकतेच भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाच्या जैवतंत्रज्ञान विभागाकडून स्टार कॉलेज स्कीम अंतर्गत दिले जाणारे अनुदान प्राप्त झाले आहे. या योजनेंतर्गत महाविद्यालयातील रसायनशास्त्र, प्राणिशास्त्र आणि भौतिकशास्त्र या विभागांच्या अंतर्गत विकासासाठी अनुदान मिळणार आहे. 29 एप्रिल रोजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गणेश ठाकूर यांनी केंद्रीय स्तरावरील तज्ज्ञांच्या समितीसमोर महाविद्यालयाच्या प्रस्तावाचे सादरीकरण केले. देशभरातून एकूण 18 महाविद्यालयांची निवड अंतिम सादरीकरणासाठी झाली होती. त्यामुळे महाविद्यालयाला नॅकच्या ‘अ’ दर्जानंतर मिळालेला हा सर्वोच्च सन्मान असल्याचे प्रतिपादन प्राचार्य डॉ. गणेश ठाकूर यांनी केले. मागील वर्षी सादर केलेल्या या प्रस्तावाला केंद्र शासनाकडून अनुदान प्राप्त झाल्यामुळे महाविद्यालयात सध्या उत्साहाचे वातावरण आहे.

महाविद्यालयाच्या या दैदिप्यमान यशामध्ये महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गणेश ठाकूर, आयक्यूएसी समन्वयक प्रा. सोपान गोवे, योजना समन्वयक डॉ. प्रमोद ठाकूर, डॉ. प्रभाकर पवार, प्रा. अनिल रोकडे, डॉ. गिरीश गुंड, प्रा. संजय गायकवाड, तसेच रसायनशास्त्र, प्राणिशास्त्र आणि भौतिकशास्त्र विभागातील सर्व प्राध्यापक यांनी मोलाचे योगदान दिले. देशपातळीवरील सन्मान प्राप्त झाल्यामुळे समाजाच्या विविध स्तरातून महाविद्यालयावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

महाविद्यालयाच्या या उज्ज्वल कामगिरीबद्दल रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शरदचंद्रजी पवार, संस्थेचे चेअरमन डॉ. अनिल पाटील , माजी चेअरमन एन. डी. पाटील , व्हाईस चेअरमन भगीरथ शिंदे, रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिलचे सदस्य व महाविद्यालय विकास समितीचे चेअरमन रामशेठ ठाकूर , रायगड विभाग सल्लागार समितीचे चेअरमन आमदार बाळाराम पाटील, उद्योगपती जे. एम. म्हात्रे,कामगार नेते महेंद्रशेठ घरत, अरुणशेठ भगत, रयत शिक्षण संस्थेचे सचिव प्राचार्य डॉ. विठ्ठल शिवणकर, सहसचिव प्राचार्य डॉ. प्रतिभा गायकवाड, ऑडिटर प्राचार्य डॉ. शिवलिंग मेनकुदळे यांनी मनःपूर्वक अभिनंदन केले.

author

    Related Articles

    प्रतिक्रिया व्यक्त करा

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत