सोशल मीडियाचा मोह आवरा

18956068 1E21 43B1 A658 FEC0286D2C38

(दीपक कांबळे)१७ ऑक्टोबर
पनवेल : सोशल मीडियाचा वापर हे दुधारी शस्त्र झाले आहे. काही तरुणी समोरच्या व्यक्तीला न भेटता, फक्त इंस्टाग्राम चॅटिंगवरून जेव्हा फसवणुकीला बळी पडतात तेव्हा सोशल मीडियाची दुसरी काळी बाजू उघडकीस येते. फसवणूक झालीच, तर बदनामीच्या कारणाला न घाबरता तक्रार देण्यासाठी पुढे आले पाहिजे. आभासी जग असले, तरी त्यातून लोक जोडले गेले आहेत. त्याचा योग्य वापर याचे भान राहिले पाहिजे. फेसबुक,इंस्टाग्राम आणि व्हॉट्‍स अ‍ॅपद्वारे तरुणींचे वेगवेगळे ग्रुप करून, मेसेज पाठवून, प्रेमाच्या जाळ्यात ओढण्याच्या तरुणाला खारघर पोलिसांनी काल शहापूर मधून पकडून गजाआड केले. त्याने तब्बल २५६ मुलींना फेसबुकवर मित्र बनविले आहे. त्यापैकी ७ ते ८ मुलींना वेळावेळी मेसेज आणि व इंस्टाग्राम अॅप संदेश पाठवून त्रास दिल्याचे तपासात समोर आले आहे. फेसबुकवरून सुंदर मुलींचे फोटो आणि मोबाइल क्रमांक मिळवून आरोपीने मुलींचा इंस्टाग्राम अ‍ॅप ग्रुप तयार केला होता. त्या ग्रुपवर सक्रीय राहून काही मुलींना प्रेमाच्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न केला. एका तरुणीला वेळोवेळी मेसेज केले आणि तिला प्रेमाची गळ घातली. त्याच्या त्रासाला कंटाळून संबंधित तरुणीने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता पण मुलीच्या आईने मुलीला सावरून तात्काळ खारघर पोलीस ठाण्यात धाव घेतलीव मुलीला होणाऱ्या त्रासाबद्दल पोलिसांना सर्व सांगितले पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता आरोपीला
सागर चव्हाण (वय २२) पकडून त्याच्या मुसक्या आवळल्या.

नवीन स्मार्टफोन घेतल्यामुळे मोबाइलवरून फेसबुक अकाउंट सुरू केले. हवे तेव्हा अकाउंट वापरून ती त्यातून लॉगआउट करत होती. चुकून कधीतरी तिच्या अकाउंटची काही माहिती लीक झाली. त्यातून तिला ब्लॅकमेल केले जाऊ लागले. घरच्या लोकांना कळले तर काय होईल याची एकीकडे भीती आणि दुसरीकडे होणारा त्रास, यातून शेवटीने तिने घरच्या लोकांना घडलेला प्रकार सांगितला. त्यांनी पोलिसांकडे तक्रार करणे टाळले होते कारण त्यातून होणाऱ्या बदनामीची त्यांना भीती होती. पण मुलीच्या आईने धाडस दाखवून तक्रार नोंद केली आणि आरोपीला पकडण्यात आले.

सोशल मीडियावर आपली माहिती देऊन अनेकांना विविध प्रकारच्या त्रासांना सामोरे जावे लागले आहे. तरुण मुलगे, मुलींना ब्लॅकमेल केले जाते. लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक संबंध ठेवले जातात. त्याचवेळी त्याचे फोटो आणि व्हिडिओ काढले जातात, नंतर ते व्हायरल करण्याची धमकी दिली जाते. अशा प्रकारांमुळे काहींनी आत्महत्या केल्याचेही प्रकार घडले आहेत. सोशल मीडियाच्या या जगात पोस्ट, लाइक्सची चढाओढ आहे. त्या नादात चुकीची माहिती शेअर होणे, गॉसिप होणे असे प्रकार होतात. आपल्याला व्यक्तिस्वातंत्र्य आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे; परंतु येथे व्यक्त होताना त्याच्या परिणामांचा विचार केला जात नाही. त्यातून अफवा पसरतात, गैरसमज होतात. सोशल मीडियाचा वापर विधायक कामांसाठी केला, तर तो नक्कीच चांगला आहे; मात्र त्यातून अनेकदा विध्वंसक कृत्येही केली जातात.

आपण व्यक्त होण्याचे माध्यम आपल्या हाती आले आहे. सोशल मीडियाचा सुकाळ होण्यापूर्वी व्यक्त होण्याची माध्यमे मर्यादित होती. त्यातून मिळणारा आनंद वैयक्तीक होता. आता आपला आनंद सार्वजनिक करताना अनेकदा भान सुटते. सोशल मीडियाचा वापर हे दुधारी शस्त्र झाले आहे. काही तरुणी समोरच्या व्यक्तीला न भेटता, फक्त फेसबुकवरील चॅटिंगवरून जेव्हा फसवणुकीला बळी पडतात तेव्हा सोशल मीडियाची दुसरी काळी बाजू उघडकीस येते. फसवणूक झालीच, तर बदनामीच्या कारणाला न घाबरता तक्रार देण्यासाठी पुढे आले पाहिजे. आभासी जग असले, तरी त्यातून लोक जोडले गेले आहेत.

author

    Related Articles

    प्रतिक्रिया व्यक्त करा

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत