सोनिया गांधींनी अशोक चव्हाणांवर पुन्हा एकदा दाखवला विश्वास, सोपवली महत्त्वाची जबाबदारी

सोनिया गांधींनी अशोक चव्हाणांवर पुन्हा एकदा दाखवला विश्वास, सोपवली महत्त्वाची जबाबदारी

पाच राज्यांतील पराभवाचा आढावा घेण्यासाठी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली पाच सदस्यीय समिती तयार करण्यात आली आहे.
याबाबत ही समिती एक अहवाल तयार करेल आणि तो काँग्रेसच्या काळजीवाहू अध्यक्षा सोनिया गांधींसमोर सादर करेल.झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाला जोरदार पराभवाचा सामना करावा लागला आहे. पश्चिम बंगाल, आसाम, केरळ, तमिळनाडू, पुदुच्चेरी (West Bengal, Pondicherry, Assam, Tamil Nadu, Kerala) या राज्यांत काँग्रेस फारशी चांगली कामगिरी करू शकला नाही. या पराभवानंतर काँग्रेस वर्किंग कमिटीची नुकतीच बैठक झाली.

त्याच्या दुसऱ्या दिवशी पाच राज्यांतील पराभवाचा आढावा घेण्यासाठी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली पाच सदस्यीय समिती तयार करण्यात आली आहे. ज्येष्ठ नेते सलमान खुर्शिद, मनीष तिवारी, व्हिन्सेंट एच. पाला आणि जोथी मनी यांचा या समितीत समावेश आहे. पाच राज्यांना भेट देऊन तिथल्या कार्यकर्त्यांशी, उमेदवारांशी आणि राज्याच्या नेतृत्वाशी चर्चा करून ही समिती एक अहवाल तयार करेल आणि तो काँग्रेसच्या काळजीवाहू अध्यक्षा सोनिया गांधींसमोर सादर करेल.

पाच राज्यांत काय झाली काँग्रेसची अवस्था

पश्चिम बंगालमध्ये (West Bengal) काँग्रेसची अवस्था दयनीय झाली आहे. पहिल्यांदाच काँग्रेसला एकही सीट मिळाली नाही. सीपीआयएम आणि फुरफुरा शरिफचे प्रमुख मौलवी अब्बास सिद्दिकी यांचा पक्ष भारतीय धर्मनिरपेक्ष फ्रंटसोबत आघाडी केली होती. तरीही काँग्रेसला राज्यात एकही जागा जिंकता आली नाही. काँग्रेसच्या बालेकिल्ल्यांतही त्यांचा पराभव झाला.

author

    Related Articles

    प्रतिक्रिया व्यक्त करा

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत