सोनाली कुलकर्णी दिसणार छत्रपती ताराराणींच्या भूमिकेत

सोनाली कुलकर्णी दिसणार छत्रपती ताराराणींच्या भूमिकेत

Sonali Kulkarni to be seen as Chhatrapati Tararani

सोनाली कुलकर्णीचे नवनवीन चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस

नवी मुंबई – अभिनेत्री सोनाली कुलकर्णीचा ‘हिरकणी’ चित्रपट प्रेक्षकांना खूप आवडला. हिरकणी चित्रपटानंतर ती आता पुन्हा नवीन ऐतिहासिक चित्रपटासोबत प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. महाराष्ट्राच्या राजकारणाची धुरा मोठ्या कौशल्यानं सांभाळत मुघलांशी दोन हात करणाऱ्या छत्रपती ताराराणींच्या शौर्याची गाथा सांगणाऱ्या चित्रपटामध्ये आता सोनाली कुलकर्णी दिसणार आहे. ‘छत्रपती ताराराणी’ असे या चित्रपटाचे नाव असून सोनाली या चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेत दिसणार आहे. छत्रपती ताराराणींच्या भूमिकेत आता आपल्याला सोनाली कुलकर्णी दिसणार असल्याची माहिती मिळते.

छत्रपती ताराराणींच्या या चित्रपटाचा पोस्टर सध्या सोशल मीडियावर वायरल होत आहे. या पोस्टरमध्ये ती घोड्यावर बसून रणरागिणीच्या हावभावामध्ये दिसून येत आहे. डॉ. जयसिंग राव पवार यांच्या लिखित ‘मोगलमर्दिनी महाराणी ताराबाई’ या ग्रंथावर हा चित्रपट आधारित असून प्रेक्षकांमध्ये याबाबत कमालीची उत्सुकता पाहायला मिळत आहे. याचे दिगदर्शन राहुल जनार्दन जाधव केले असून या चित्रपटाचे संगीत अवधूत गुप्ते यांनी दिले आहे. आता या चित्रपटाचा टीजर कधी पाहायला मिळणार याकडेच प्रेक्षकांचे लक्ष आहे.

लोकेश गुप्ते दिग्दर्शित ‘डेट भेट’ या चित्रपटामध्ये सोनाली कुलकर्णी मुख्य भूमिकेत दिसणार असून लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तसेच मराठी सिनेसृष्टीतील अनेक प्रसिद्ध कलावंत एकाच वेळी ‘झिम्मा’ या चित्रपटात प्रेक्षकांना पाहायला मिळणार असून या चित्रपटाचे दिगदर्शन हेमंत ढोमे यांनी केले आहे. निर्मिती सावंत, सुहास जोशी, सुचित्रा बांदेकर, क्षिती जोग, सोनाली कुलकर्णी, सायली संजीव, मृण्मयी गोडबोले यांच्यासह सिद्धार्थ चांदेकर हे कलाकार प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. यासह ‘फ्रेश लाईम सोडा’ या चित्रपटामध्ये सोनाली कुलकर्णी आणि प्रार्थना बेहरे या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार असून लवकरच हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

author

    Related Articles

    प्रतिक्रिया व्यक्त करा

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत