सोनं महागलं तर चांदीच्या दरात घट; जाणून घ्या आजचे दर

सोनं महागलं तर चांदीच्या दरात घट; जाणून घ्या आजचे दर

If gold is expensive, silver prices fall; this is the Today's Rates

नवी मुंबई – भारतीय देशांतर्गत बाजारात सोन्या चांदीच्या किंमतीत पुन्हा एकदा चढ-उतार पहायला मिळत आहे. इंडिया बुलियन अॅन्ड ज्वेलर्स असोसिएशनच्या माहितीनुसार, आज (08 जुलै) सकाळी मुंबई आणि पुण्यात सोन्याच्या किंमतीत 220 रुपयांची वाढ झाली असून 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा भाव हा 47,970 रुपये इतका आहे तर 22 कॅरेट सोन्याचा भाव हा 46,970 रुपये इतका आहे. चांदीच्या किंमतीने या आधीच सत्तर हजारी पार केली आहे. आज चांदीच्या किंमतीत 600 रुपयांची घट झाल्याचं पहायला मिळालं असून एक किलो चांदीसाठी आता 70 हजार रुपये मोजावे लागतील.गेल्या काही दिवसांपासून स्थिर असलेल्या सोन्याच्या किंमतीत दोन दिवसांपासून बदल होत असल्याचं दिसून आलंय. सोन्याच्या किंमतीत मंगळवारी 120 रुपयांची तर बुधवारी 320 रुपयांची वाढ झाली आहे. सध्या सोन्याच्या किंमती आवाक्यातील असून त्यामध्ये गुंतवणूक करण्याचा हाच योग्य काळ असल्याचं मत काही तज्ज्ञांनी व्यक्त केलंय. येत्या काळात सोन्याच्या किंमती पुन्हा वाढण्याची शक्यता आहे असा अंदाजही त्यांनी व्यक्त केला आहे.

author

    Related Articles

    प्रतिक्रिया व्यक्त करा

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत