‘सैराट’ नंतर आर्ची-परश्या पुन्हा एकत्र

‘सैराट’ नंतर आर्ची-परश्या पुन्हा एकत्र

Archie-Parsha reunites after ‘Sairat’

नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘सैराट’ या चित्रपटातून दोन नवे चेहरे प्रेक्षकांच्या भेटीला आले. ते चेहरे म्हणजे रिंकू राजगुरु आणि आकाश ठोसर.

WhatsApp Image 2021 07 24 at 12.30.53 PM

२९ एप्रिल २०१६ रोजी दिग्दर्शक नागराज मंजुळे यांचा ‘सैराट’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आणि या चित्रपटाने सबंध महाराष्ट्राला याड लावलं.

WhatsApp Image 2021 07 24 at 12.30.52 PM

सैराट’ या मराठी चित्रपटापासून रिंकू राजगुरु आणि आकाश ठोसर ही नावं आता महाराष्ट्रातील घराघरात परिचयाचं झालं आहे. ‘सैराट’ चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर लोकांनी दोघांनाही अक्षरक्ष: डोक्यावर उचलून घेतलं होतं. आता बऱ्याच दिवसानंतर आर्ची आणि परश्याची भूमिका साकारणारे रिंकू आणि आकाश एकत्र आले आहेत. या भेटीचं फोटो रिंकू आणि आकाशने इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत. ‘सैराट’, ‘कागर’, ‘मेकअप’ या चित्रपटानंतर रिंकूने ‘हंड्रेड’ या हिंदी वेब सीरिजमधून देशवासियांची पसंती मिळवली. ‘सैराट’, ‘एफयू’नंतर आकाश ‘लस्ट स्टोरीज’ या नेटफ्लिक्सवरील चित्रपटात झळकला होता.

WhatsApp Image 2021 07 24 at 12.30.53 PM 1

लवकरच रिंकू एका बिग बजेट मराठी चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘छूमंतर’ असं या चित्रपटाचं नाव असून लंडनमध्ये या चित्रपटाचं चित्रिकरण करण्यात आले आहे.

author

    Related Articles

    प्रतिक्रिया व्यक्त करा

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत