सेतू बांधा रे !

सेतू बांधा रे !

Setu Bandha Re !

-बंडू बिरमल माळी (सहा.शिक्षक)
धर्मवीर संभाजी विद्यालय, विक्रोळी

चालू शैक्षणिक वर्षासाठी महाराष्ट्र शासनाने दि १ जुलै ते १५ ऑगस्ट या ४५ दिवसांमध्ये ‘ सेतू ‘ अभ्यासक्रम राबवण्यासाठी शासन आदेश निर्गमित केला असल्याने शिक्षक आणि मुख्याध्यापक यांच्यापुढे प्रश्न पडला आहे की हा ‘सेतू’ बांधायचा कसा ? कारण सेतूसाठी अभ्यासक्रम दिला आहे तो मागील इयत्तेचा आहे आणि मागील इयत्तेची पाठ्यपुस्तके शाळांनी जमा करून पुढील इयत्तेच्या वर्गातील विद्यार्थ्यांना दिली आहेत मग हा सेतू बांधायचा कसा ? सेतूच्या अभ्यासक्रमाची पीडीएफ झेरॉक्स काढून पालकांनी घ्यायची म्हणाली तर किमान ₹२०० रु. खर्च येणार आहे . हा खर्च म्हणजे दुष्काळात तेरावा महिना अशी परिस्थिती झाली आहे. शिवाय हा सेतू फक्त मराठी, हिंदी, ऊर्दू या माध्यमांसाठीच आहे ‘सेमी’ माध्यमांचा विचारच शासनाने केलेला दिसत नाही आणि इंग्रजी माध्यमाच्या सेतू पक्का आहे हा गैरसमज आहे की काय ? त्यातच ‘सेतू’ राबवायचा तर पुढील इयत्तेच्या अभ्यासक्रमाचे काय करायचे? एक तर पालकांकडे स्मार्ट फोन नाही, रिचार्जसाठी पैसे कुठून आणायचे ? एकाच पालकांची दोन अपत्ये वेगवेगळ्या वर्गात शिकत असतील तर त्या दोन आप्तयांमधील ‘सेतू’ अभ्यासक्रमाच्या अंमलबजावणी साठी शासनाचे नियोजन ढिसाळ असल्याने ” सेतू” कसा उभारायचा हा प्रश्न शिक्षकांपुढे आहे. शेवटी हा सेतू बांधण्यासाठी जे साहित्य पाहिजे ते न पुरवल्याने हा सेतू उभारण्यापूर्वीच कोसळणार हे निश्चित ! तरीही चला सर्वजन म्हणूया, ‘ सेतू बांधा रे ! ‘

बंडू बिरमल माळी (सहा.शिक्षक)
धर्मवीर संभाजी विद्यालय, विक्रोळी

author

    Related Articles

    प्रतिक्रिया व्यक्त करा

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत