सृजनशील तरुणाईचा ‘विवेक जागर करंडक’ या वर्षी होणार ऑनलाईन

सृजनशील तरुणाईचा ‘विवेक जागर करंडक’ या वर्षी होणार ऑनलाईन
  • येत्या १८ ऑगस्टला झूम अँप तसेच फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून होणार सादर

पनवेल: नेहमीचाच जल्लोष आणि उत्साह घेऊन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पनवेल शाखा आणि पनवेल विवेकवाहिनी आयोजित ‘विवेक जागर करंडक २०२१’ ही नाट्य सादरीकरण स्पर्धा या वर्षी कोरोना आणि सद्यपरिस्थिती लक्षात घेता येत्या 18 ऑगस्टला झूम ऍप तसेच फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून सादर होणार असून ‘हिंसा के खिलाफ मानवता की ओर’ या अभियाना-अंतर्गत स्पर्धेसाठी ह्या वर्षीचा विषय ‘म…मारण्याचा की म… माणुसकीचा !?’ असा देण्यात आला आहे.

‘विवेक जागर करंडक’चे हे तिसरे वर्ष असून ही १५ ते ३० वयोगटासाठी खुली स्पर्धा आहे. ऑनलाईन मंचावर ई-नाट्य स्वरूपात सादर होणाऱ्या ह्या स्पर्धेत राज्यातील वेगवेगळ्या भागातून विविध महाविद्यालये या स्पर्धेत सहभागी होणार आहेत.

ह्या माध्यमाच्या मार्फत तरुणांमध्ये संवेदनशील विषयांवर एकत्र काम, विचारांची घुसळण आणि कलाविष्कार सादर करण्याची आणि तरुणांना आपलं म्हणणं सांस्कृतिक अंगाने लोकांपुढे ठेवण्याची उत्तम संधी ‘विवेक जागर करंडक’च्या माध्यमातून मिळत असते. सध्याच्या युगात तरुणाईने हिंसामुक्त समाजाचा विचार करावा, मानवतेचा जागर करावा यासाठी ही स्पर्धा घेतली जात आहे.

डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खूनाला ८ वर्ष पूर्ण होत आहेत, मारेकरी पकडले असले तरीही खरा सूत्रधार सापडलेला नाही. डॉक्टर दाभोलकरांच्या खूनाचा निषेध करतानाच कोणत्याही प्रकारची हिंसा ही मानवतेला घातकच आहे आणि अशा प्रकारच्या हिंसा सामाजिक स्वास्थ्य बिघडवत असतात, हा विचार समिती रुजवू पाहतेय.

‘विवेक जागर करंडक’ ही स्पर्धा ऑनलाईन लाईव्ह रेकॉर्डिंग पद्धतीने फेसबुक लाईव्ह घेतली जाणार आहे त्यामुळे तरुणाईला भरभरून प्रतिसाद देणारे प्रेक्षकांसाठीही ही वैचारिक मनोरंजनाची संधी असणार आहे. अधिकाधिक तरुणाईने यात सहभाग घ्यावा आणि रसिकप्रेक्षकांनी घरबसल्या नि:शुल्क स्पर्धेचा आनंद ‘विवेकसाथी पनवेल’ या फेसबुक पेज’वर घ्यावा, असे आवाहन समितीतर्फे करण्यात येत आहे.

अधिक माहितीसाठी संपर्क:
८६५२६१७३८२, ८०८२६९३९०३

administrator

    Related Articles

    प्रतिक्रिया व्यक्त करा

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत