सुहासिनी अय्यर- ‘द मिशन अर्टिमिस’

सुहासिनी अय्यर- ‘द मिशन अर्टिमिस’

Suhasini Iyer - 'The Mission Artemis'

NASA : नासाचा अत्यंत महत्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या ‘मिशन अर्टिमिस’मध्ये भारतीय वंशाच्या सुहासिनी अय्यर या महत्वाची जबाबदारी पार पाडत आहेत. सुहासिनी अय्यर या मिशन आर्टिमिसमध्ये रॉकेटच्या कोअर स्टेजचे कामकाज पाहत असून त्या या मिशनच्या बॅकबोन असल्याचं सांगण्यात येतंय. ही भारतासाठी अभिमानाची गोष्ट असून त्यामुळे अंतराळ क्षेत्राच्या विकासामध्ये भारतीयांनी आपला दबदबा कायम ठेवला असल्याचं स्पष्ट झालं आहे. भारतीय वंशाच्या सुहासिनी अय्यर या अर्टिमिस-1 च्या लॉन्च इंटिग्रेटेड प्रोडक्ट टीमचे नेतृत्व करत आहेत. त्यामध्ये या मिशनसाठी लागणाऱ्या विविध घटकांची निर्मिती केली जात आहे.

author

    Related Articles

    प्रतिक्रिया व्यक्त करा

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत