सिरसदेवी येथे चेकपोस्ट सह नाकाबंदी करुन वाहणाची चौकशी सह दोन दुकानदारावर कार्यवाही

सिरसदेवी येथे चेकपोस्ट सह नाकाबंदी करुन वाहणाची चौकशी सह दोन दुकानदारावर कार्यवाही

पोलीस आरोग्य आपत्ती व्यवस्थापन विभाग व ग्रामपंचायतकडुन धडक कार्यवाही सुरु

गेवराई प्रतिनिधी

गेवराई तालुक्यातील सिरसदेवी येथे
दि १९ बुधवार रोजी नियमांचे उल्लंघन करणाऱ्या दोन दुकानावर दंडात्मक कारवाई करून दुकान  सिल करण्यात आली आहे तसेच विनाकरण फिरणार्या वाहणचालकावर दंडात्मक कार्यवाही करुन नागरीकांना सुचना देत विनाकारण घरा बाहेर फिरु नका आशा सुचना दिल्या आहेत

सविस्तर असे की गेवराई तालुक्यात कोरोना बाधितांचा आकडा अधिक वाढत आहे. सध्या शहरापेक्शा ग्रामीण भागात आधिक रुग्ण आढळून येत आहेत.  बुधवारी मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार हे पाहणी करण्यासाठी  सिरसदेवीत आले असता स्वतः हा रस्त्यावर उभे राहून कोरोना नियमाचे उल्लंघन करणार्यावर दंडात्मक कारवाई करून दोन दुकाने सिल केली.तसेच  विनाकारण फिरणारे व दुकानदारांकडून ११ हजार ४०० रुपयेचा दंड वसूल करण्यात आला. यावेळी  सिईओ अजित कुंभार यांनी सर्व विभागांना कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच नागरिकांनी विनाकारण बाहेर पडू नये, मस्कचा वापर करावा, दुकाने उघडू नयेत, कोरोना नियमाचे पालन करावे असे आव्हान केले आहे. विनाकारण फिरणाऱ्या व दुकान उघडी ठेवणाऱ्यावर कारवाई करताना सीईओ अजित कुंभार, गटविकास अधिकारी अनिरुद्ध सानप, ग्रामसेवक देवकर, सिरसदेवी चे सरपंच रवींद्र बप्पा गाडे, तलवाडा पोलीस स्टेशन चे सपोनि प्रताप नवघरे सह कर्मचारी   उपस्थित होते.

administrator

    Related Articles

    प्रतिक्रिया व्यक्त करा

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत