सिडको नवी मुंबई, पनवेलमध्ये काढणार ८९ घरांची लॉटरी

सिडको नवी मुंबई, पनवेलमध्ये काढणार ८९ घरांची लॉटरी

Cidco to draw 89 house lotteries in Navi Mumbai, Panvel

नवी मुंबई- मुंबईसह नवी मुंबईत स्वतःचे घर असावे असे प्रत्येकाचे स्वप्न असते, मात्र घरांच्या किमती बघता सर्व सामन्यांना आपल्या स्वप्नांना मुरड घालावी लागते. त्यामुळे म्हाडा आणि सिडकोने सवलतीच्या दरात नागरिकांना घरे उपलब्ध करुन देण्याचे निश्चित केले आहे. आता सिडकोकडून तब्ब्ल ८९ हजार घरांची लॉटरी काढण्यात येणार आहे. सवलतीच्या दरात नागरिकांना ही घरे उपलब्ध होणार असल्याने नागरिकांचे आपल्या हक्काचे घर घेण्याचे स्वप्न आता पूर्ण होणार आहे.

सिडकोने २०१८-१९ रोजी महागृहनिर्माण योजनेअंतर्गत तब्ब्ल १४ हजारांहून अधिक घरांसाठी लॉटरी काढली आली होती. या लॉटरीतील विजेत्यांना आज नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते घरांचे वाटप कऱण्यात आले. यावेळी सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक संजय मुखर्जींकडून सांगण्यात आले की, “सिडको लवकरच ८९ हजार घरांची लॉटरी काढणार आहे. नवी मुंबई पनवेल आणि उरण या भागांमध्ये ही घरे उभारण्यात येणार येतील”. अल्पउत्पन्न आणि अत्यल्प उत्पन्न या गटांसाठी या घरांची सोय असेल असे देखील ते यावेळी म्हणाले.

सिडकोकडून १५ हजार घरांची लॉटरी काढण्यात आली होती. मात्र गेली दोन वर्ष झाले प्रकल्प रखडल्याने लाभार्थ्यांना आर्थिक नुकसान सोसावे लागत होते. कळंबोली येथील गृह प्रकल्पातील १०० घर लाभार्थ्यांना नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, खासदार राजन विचारे यांच्या हस्ते आज घरांच्या चावीचे वाटप करण्यात आले. सिडकोने घरांच्या चाव्या दिल्याबद्दल लोकांकडून समाधान व्यक्त केले जात आहे.

author

    Related Articles

    प्रतिक्रिया व्यक्त करा

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत