सिडकोने पुलाचे बांधकाम त्वरित करण्यासाठी शिवसेनेतर्फे निवेदन

सिडकोने पुलाचे बांधकाम त्वरित करण्यासाठी शिवसेनेतर्फे निवेदन

Shiv Sena submits statement to Cidco to expedite construction of bridge

-विठ्ठल ममताबादे

उरण – उरण पनवेल मार्गांवर सिडको ऑफिस जवळील पूल धोकादायक व खराब झाल्याने या मार्गावर अवजड वाहनांना बंदी घालण्यात आलेली आहे. सदर धोकादायक पुलामुळे बोकडवीरा सेक्टर 41,30, फुंडे सेक्टर 15,27, डोंगरी सेक्टर 25 आणि पाणजे सेक्टर 29 या गावांचा संपर्क तुटलेला आहे. दैनंदिन व्यवहारासाठी हा मार्ग त्वरित एकमेकांना जोडणे आवश्यक आहे. कारण गावांशी संपर्क तुटल्याने गावातील रहिवाशांना दळणावळणाची साधने उपलब्ध होत नाहीत. परिणामी व्यापार, व्यवसाय, नोकरीं, धंद्यासाठी जाणाऱ्या येणाऱ्या गावाकऱ्यांना याचा त्रास होत आहे. विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी किंवा अन्य कामासाठी जाण्यासाठी त्रास सहन करावा लागत आहे. चार गावांचा परिसर आणि सेक्टरचा विकास करताना विकासकांना दळणावळनाच्या अडचणी निर्माण होऊन प्रकल्प पूर्ण करण्यास उशीर होऊ शकतो. या अगोदरच उरण मध्ये एक ब्रिज कोसळून एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. म्हणून पुढील संभाव्य अपघात टळणे आवश्यक आहे.

IMG 20210712 WA0048

या सर्व विषयांचे गांभीर्य लक्षात घेता आणि संभाव्य धोका टाळण्यासाठी पुलाचे बांधकाम युद्ध पातळीवर हाती घेणे गरजेचे आहे. असे मत निवेदन द्वारे व्यक्त करत चार गावांचा तुटलेला संपर्क त्वरित युद्ध पातळीवर जोडण्यात यावे. पुलाचे बांधकाम त्वरित सुरु करण्यात यावे व जनतेला दिलासा द्यावा अशी मागणी जगजीवन भोईर शिवसेना द्रोणागिरी शहर शाखा प्रमुख यांनी व्यवस्थापकीय संचालक सिडको, जिल्हाधिकारी कार्यालय रायगड, कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग उरण पनवेल या ठिकाणी पत्रव्यवहाराद्वारे केले आहे.

author

    Related Articles

    प्रतिक्रिया व्यक्त करा

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत