सालासर फर्टीलायझरचे लायसन रद्द ; संजय आणि गोयल फर्टीलायझरवर धाडी टाकून कारवाई

सालासर फर्टीलायझरचे लायसन रद्द ; संजय आणि गोयल फर्टीलायझरवर धाडी टाकून कारवाई

License of Salasar Fertilizer cancelled; Sanjay and Goyal raid fertilizer and take action

प्रतिनिधी, परतूर मंठा

नवी मुंबई- महाराष्ट्र नवनिर्माण सेना जिल्हा जालना च्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन परतूर मंठा तालुक्यातील फर्टिलायझर मालक अधिकचे पैसे घेऊन सोयाबीन बियाणे विकत आहेत, अशा प्रकारची तक्रार करण्यात आली होती, त्या तक्रारीच्या अनुषंगाने गुरुवारी २ जून रोजी परतुर येथील फर्टीलायझर लायसन धारकांच्या दुकानावर जिल्हा कृषी अधिकारी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली गायकवाड यांनी टीम तयार करून सालासर संजय गोयल फर्टीलायझर दुकानावर धाड टाकून कारवाई केली. बोगस बिल दिले म्हणून संजय फर्टीलायझर व गोयल फर्टीलायझरवर धाडी टाकून कारवाई करण्यात आली आणि या दोन्ही फर्टीलायझर चे लायसन रद्द करून कृषी अधिकारी शिंदे यांनी दुकानांना सील ठोकून कठोर कार्यवाही केली आहे.

WhatsApp Image 2021 07 01 at 9.04.14 PM

यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने जिल्हा कृषी अधिकारी शिंदे यांना मागणी करण्यात आली तालुका कृषी अधिकारी परतूर मंठा पंचायत समिती कृषी अधिकारी परतूर मंठा यांनी आठवड्यातून दोन वेळा परतूर मंठा तालुक्यातील फर्टीलायझर दुकानदाराच्या दुकानावर जाऊन सखोल चौकशी केली पाहिजे अशी मागणी देखील मनसेच्या वतीने करण्यात आली, सोबत मनसे पदाधिकारी मनसे तालुकाध्यक्ष परतुर,कृष्णा गोवर्धन सोळंके, अर्जुन मोहिते, बळीराम भाकड, आत्माराम जगताप, विश्वंभर कुलकर्णी, शेतकरी सुद्धा उपस्थित होते.

author

    Related Articles

    प्रतिक्रिया व्यक्त करा

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत