सानपाडा पोलीस स्टेशनमध्ये पोलिसांना रेनकोट आणि मास्कचे वाटप

सानपाडा पोलीस स्टेशनमध्ये पोलिसांना रेनकोट आणि मास्कचे वाटप

Distribution of raincoats and masks to police at Sanpada police station

समाजसेवक सुनिल कॄष्णा सुतार यांचा स्तुत्य उपक्रम.

नवी मुंबई – स्व:कृष्णा सुतार चैरिटेबल ट्रस्ट, नवी मुंबई यांच्या वतीने समाजसेवक सुनिल सुतार आणि समाजसेविका बिंदिया सुनिल सुतार यांच्या वतीने सानपाडा पोलीस स्टेशन येथील महिला पोलीस आणि पुरुष पोलीस कर्मचाऱ्याना रेनकोट तसेच मास्क वाटप करण्यात आले.

WhatsApp Image 2021 06 30 at 10.38.14 PM

देशातील प्रत्येक नागरिक सुरक्षित राहावे यासाठी पोलिस बांधव 24 तास ड्यूटी करत असतो. कोविड काळात देखील आपल्या परिवारापासून दूर राहून तसेच आपल्या जीवाची पर्वा न करता नागरिकांच्या रक्षणासाठी रस्त्यावर उभे होते. पावसाळा सुरु झाला आहे.पोलीस बांधवांचे आभार व्यक्त करण्याच्या दृष्टी कोणातून त्यांना एक छोटीसी भेट म्हणून रेनकोट तसेच एन 95 मास्क देण्यात आले.

या प्रसंगी सानपाडा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक सुभाष निकम, पोलीस निरिक्षक गुन्हे शाखा बापूराव देशमुख,सहाय्यक पोलीस निरिक्षक निलेश राजपूत, सहाय्यक पोलीस निरिक्षक महेश श्रीराव,कैलास वानखेडे, काशिनाथ माने,जयराम राठोड, समाजसेवक भाऊ भापकर,समाजसेवक संदीप अग्रवाल, समाजसेवक सचिन अडसुळ आदि मान्यवर उपस्थित होते.

author

    Related Articles

    प्रतिक्रिया व्यक्त करा

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत