सलाम बॉम्बे फाऊंडेशनच्या क्रिएटिव्ह आर्ट अकादमीमध्ये प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा स्तुत्य उपक्रम

सलाम बॉम्बे फाऊंडेशनच्या क्रिएटिव्ह आर्ट अकादमीमध्ये प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा स्तुत्य उपक्रम

२०१९ पासून चीन या देशापासून पसरत असलेला कोविड-१९ हा आजार भारतातही आला आणि भारतीयांचे जनजीवन विस्कळीत करून गेला . खरं तर मुंबई इतकी शांत कधीच नव्हती जी आपण मागील दीड वर्षांपासून पाहत आहोत, मुंबईकरांनी तर न धावत जगणे हे याच काळात अनुभवले असेल. सुरुवातीला तर संपूर्ण जगभरात या कोविड-१९ आजारामुळे लोक मृत्युमुखी पडत होते. एखाद्या युद्धाने जितके नुकसान होणार नाही तितके नुकसान या आजाराने देशाचे केले आहे. या आजारापासून वाचण्याकरिता बरेच संशोधन सुरु झाले. लोकांना याचा दुष्परिणाम कळवा याकरिता बरीच जनजागृती करण्यात आली. जनजागृती संदर्भात जाहिराती, लेखन, कविता, गाणी या द्वारे लोकांमध्ये जनजागृती करण्यात आली तसेच पोस्टर (भित्तीपत्रके) ही तयार करण्यात आले . कोविड-१९ हा आजार पसरू नये म्हणून सरकारने बरेच कडक नियम ही केले जेणेकरून लोक या नियमांचे पालन करतील.

सलाम बॉम्बे फाऊंडेशन क्रिएटिव्ह आर्ट अकादमी च्या विद्यार्थ्यांनी अनेक कोविड-१९ जनजागृती स्पर्धां मध्ये भाग घेतला . हे विद्यार्थी ब क्रिएटिव्ह आर्ट अकादमीच्या माध्यमातून चित्रकलेचे तंत्रशुद्ध प्रशिक्षण घेत आहेत. या विद्यार्थ्यांनी कोविड-१९ जनजागृती चित्रकला स्पर्धांमध्ये भाग घेत अनेक पारितोषिके प्राप्त केली आहेत . विद्यार्थ्यांना झालेली जाणीव त्यांनी एका उपक्रमाव्दारे दाखवून दिली आहे.

आपल्या विभागातील लोकांनी
कोविड-१९ आजाराकडे गांभीर्याने पहावे, निष्काळजीपणा करू नये , सरकारने घालून दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे याची त्यांना जाणीव होऊ लागली आणि म्हणूनच क्रिएटिव्ह आर्ट अकादमीतील १० विद्यार्थ्यांनी आपल्या विभागाचे निरीक्षण केले कि कोणते नियम आपल्या विभागातील लोकांना ठासून सांगितले पाहिजे ह्याकडे लक्ष दिले जेणेकरून ते त्याचे उल्लंघन करणार नाहीत. यानुसार त्यांनी कोविड-१९ नियमांचे जनजागृतीपर पोस्टर तयार केले. फक्त ते इथेच थांबले नाहीत तर त्यांनी आपल्या विभागातील पक्ष कार्यकर्ता यांच्याकडे जाऊन त्यांच्या हस्ते हे पोस्टर आपल्या एरियाच्या दर्शनी भागात लावले जेणेकरून लोक याची गांभीर्याने दखल घेतील. अश्या पद्धतीने हे १० पोस्टर धारावी, परेल, कुलाबा , गणेशगल्ली, लालबाग आणि चेंबूर या भागात लावले गेले. शालेय विद्यार्थ्यांकडून होत असलेला या जनजागृतीपर उपक्रमाचे कौतुक त्यांच्या विभागातील विविध मान्यवरांकडून तसेच वस्तीतील रहिवाश्यांकडून केले जात आहे.

administrator

    Related Articles

    प्रतिक्रिया व्यक्त करा

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत