सलाम बॉम्बे फाउंडेशन मीडिया अकादमीतर्फे जागतिक छायाचित्र दिनानिमित्ताने छायाचित्र प्रदर्शनाचे आयोजन

सलाम बॉम्बे फाउंडेशन मीडिया अकादमीतर्फे जागतिक छायाचित्र दिनानिमित्ताने छायाचित्र प्रदर्शनाचे आयोजन

कोरोना विषयक गाईडलाईन्सचे तंतोतंत पालन करत पार पडणार प्रदर्शन

सलाम बॉम्बे फाउंडेशन मार्फत गत १९ वर्षांपासून विद्यार्थ्यांच्या कलात्मक व गुणात्मक विकासासाठी प्रिव्हेंटीव हेल्थ प्रोग्राम , खेळ, कला, मिडीया ह्या अकादमी आणि व्यावसायिक कौशल्य विकास असे विविध उपक्रम राबविले जात आहेत. सध्या कोरोना महामारीमुळे सर्व उपक्रम ऑनलाईन पद्धतीने राबविले जात आहेत. सदर उपक्रमांपैकी सलाम बॉम्बे मिडीया अकादमीव्दारे इयत्ता ७ वी ते ९वी च्या विद्यार्थ्यांना भाषिक कौशल्य, संवाद कौशल्य, फोटोग्राफी, व्हिडिओग्राफी, क्रिएटिव्ह रायटींग अशा कौशल्यांचे प्रशिक्षण, ह्या क्षेत्रांमधील करिअरची ओळख व मार्गदर्शन दिले जाते. फोटोग्राफीचे प्रशिक्षण देत असताना प्रशिक्षणातून विकसितझालेल्या कौशल्यांना सादर करण्यासाठी विद्यार्थ्यांना मंच उपलब्ध करुन देणे अतिशय महत्त्वाचे आहे. याकरिता अकादमी मार्फत दरवर्षी एकोणीस ऑगस्ट हा जागतिक छायाचित्र दिवस साजरा करण्यात येतो. यासाठी फोटोग्राफी क्षेत्रातील नामवंत मास्टर फोटोग्राफर्स विद्यार्थ्यांना विविध सत्रांद्वारे मार्गदर्शन करतात व विद्यार्थी विविध छायाचित्रांचे प्रकल्प करतात. विद्यार्थांनी काढलेली उत्तम छायाचित्रे इतर विद्यार्थ्यांसाठी व प्रेक्षकांसाठी प्रदर्शनामार्फत सादर केली जातात.

यावर्षी जागतिक छायाचित्र दिनाच्या निमित्ताने फोटो-जर्नालिजम विषयाला अनुसरून विद्यार्थ्यांनी काढलेल्या छायाचित्रांच्या एका मर्यादित प्रदर्शनाचे नियोजन दिनांक १३ ऑगस्ट २०२१ रोजी त्रिवेणी संगम म.न.पा. शालेय इमारत सभागृह, तळ मजला, करी रोड (पूर्व), मुंबई – १२ येथे सकाळी ११:३० ते संध्याकाळी ६ पर्यंत आयोजित करण्यात आले आहे. सदर प्रदर्शनासाठी अनेक वर्षांपासून फोटो-पत्रकारितेचे कार्य करित असलेले छायाचित्रकार विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असून विद्यार्थ्यांनी विविध सामाजिक विषयांना घेऊन छायाचित्रे काढली आहेत. महत्त्वाचे म्हणजे या प्रदर्शनाला कोणतेही इतर विद्यार्थी किंवा प्रेक्षक प्रत्यक्ष भेट देणार नसून केवळ काही ठराविक अधिकारी वर्ग व प्रमुख पाहूणेच प्रत्यक्ष भेट देतील. यावेळी कोरोना विषयक गाईडलाईन्सचे तंतोतंत पालन केले जाईल. पुढे, प्रदर्शनाचा एक व्हिडिओ बनवून नंतर एकोणीस ऑगस्ट रोजी इतर विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने दाखविला जाईल.

दिनांक 13 ऑगस्ट 2021 रोजी आयोजित केलेले फोटोग्राफी प्रदर्शन हे कोरोना विषयक गाईड लाईन्स चे तंतोतंत पालन करून व नियोजन बद्ध पार पडावे यासाठी भेट देण्यापूर्वी अधिक माहितीसाठी 8655768774 या क्रमांकावर सपंर्क साधावा

administrator

    Related Articles

    प्रतिक्रिया व्यक्त करा

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत