सर्वसामान्यांचा कोरोनाशी लढा….

सर्वसामान्यांचा कोरोनाशी लढा….


सम्पूर्ण देशभरात कोरोनाचा प्रभाव दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढत असल्यामुळे सरकारने त्याला रोखण्यासाठी ठोस निर्णय घेऊन संपूर्ण देशात लोकडाऊनची प्रक्रिया अवलंबली व संपूर्ण देशभरातील जनतेला पंतप्रधानानी सम्बोधीत करून एकत्र येण्यास प्रतिबंध घालून संचार बंदीची घोषणा गेली केली.त्यामुळे सगळ्या प्रकारचे रोजगार व सर्वसामन्याचे काम बंद झाले.त्यामुळे सर्वसामान्याचा खरा संघर्ष त्यावेळा पासून सुरु झाला कारण बरेच असे कामगार वर्ग आहे ज्यांच्या वर संपूर्ण घराची जिम्मेदारी म्हणजे कमावणारा एक आणि खाणारे पाच त्यामुळे रोज कामातून मिळालेला पैसा हा रोजच्या खर्चात जायचा त्यामुळे कुठल्याही प्रकारची जमापुंजी त्यांच्या कडे नसल्यामुळे उपासमारीची खरी वेळ त्यांच्या वर आली.उसनवारी वर सावकारा कडून पैसे घेऊन सध्याचा आपल्या परिवाराचा पोट भरायचा प्रश्न एका वेळे पुरता मिटला पण सावकाराचे घेतलेले पैसे परत देण्याची ची चिंता तर असतेच पण काम बंद व कोणाकडे काम मागायला गेले तरी काम नाही आणि बाहेर पोलीसांचा कडेकोट पहारा व त्यामुळे घराबाहेर पडण्याचा प्रश्नच नाही कारण घरा बाहेर गेल तर पोलीसांचा चोप नक्कीच मिळणार यांची भीती पण जो प्रयन्त खिश्यात पैसा तो पर्यंत कॉरोनची भीती पण ज्या दिवशी पैसा संपला त्या दिवशी कोरोना ची भीती पण संपते व हे सर्वसामान्याच्या बाबतीत प्रामुख्याने बघायला मिळाली.शासनाने मोफत राशन वाटपाची मोहीम राबवली त्यामुळे सर्वसामान्यांना थोडासा का होईना पण आधार मिळाला पण हे कुठवर चालणार ही चिंतेची बाब आहे.कोरोना मुळे देशातील प्रत्येक नागरिक मोठ्या प्रमाणात त्रासाला सामोरे गेला मग ते मानसिक असो वा आर्थिक पण त्यांनी 22 मार्च पासून ते आज प्रयत्न सलग त्या त्रासाला सामोरे व त्याच्या लढताना दिसत आहे.
किरण सोनार

administrator

    Related Articles

    प्रतिक्रिया व्यक्त करा

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत