सरपंच मोहन देवकते यांच्या मागणीनुसार पेंडगाव येथे कोव्हीड लसीकरण सुरू

सरपंच मोहन देवकते यांच्या मागणीनुसार पेंडगाव येथे कोव्हीड लसीकरण सुरू

Covid vaccination started at Pendgaon as per the demand of Sarpanch Mohan Devkate

गेवराई प्रतिनिधी

बीड तालुक्यातील आनंदवाडी येथील सरपंच तथा पंचायत समिती मेंबर मोहन नाना देवकते यांनी बहीरवाडी सर्कलमधील नागरिकांना लसीकरण करण्यासाठी मागणी केली होती सरपंच मोहन नाना देवकते यांच्या मागणीनुसार पेंडगाव येथे कोव्हीड 19 लसीकरण सुरू करण्यात आले असून नागरिकांनी लसीकरण करून घ्यावी असे आव्हान सरपंच मोहना देवकते यांनी पत्रकारांशी बोलताना केले आहे

बीड तालुक्यातील बहिरवाडी सर्कल मधील नागरिकांना लसीकरणासाठी गैरसोय होऊ नये म्हणून आनंदवाडी चे सरपंच तथा पंचायत समिती मेंबर मोहन नाना देवकते यांनी वेळोवेळी पाठपुरावा करून पेंडगाव येथे लसीकरण सुरू करण्याची मागणी केली होती मागणीनुसार पेंडगाव येथे दि 3/7/2021 रोजी covid-19 लसीकरण सुरू करण्यात आले आहे बहीरवाडी आनंदवाडी परिसरातील नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे असे आव्हान आनंदवाडी सरपंच तथा पंचायत समिती मेंबर मोहन नाना देवकते यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले आहे

author

    Related Articles

    प्रतिक्रिया व्यक्त करा

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत