सय्यद कंस्ट्रक्शन एजन्सीवर चौकशी व्हावी- मनसे जिल्हा जालना

सय्यद कंस्ट्रक्शन एजन्सीवर चौकशी व्हावी- मनसे जिल्हा जालना

Inquiry to be conducted on Syed Construction Agency - MNS District Jalna

नवी मुंबई- मनसे जिल्हाध्यक्ष प्रकाश सोळंके यांनी सय्यद कंट्रक्शन एजन्सीने केलेल्या कामांची चौकशी करण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांना केली आहे. परतुर मंठा तालुक्यात सय्यद कंट्रक्शन एजन्सीने 2014 ते 2021 या ७ वर्षांच्या कालावधीत जी कामे केली आहेत ती बोगस आणि निकृष्ट दर्जाची कामे असल्याने याबाबत चौकशी व्हावी असे निवेदन मनसे जिल्हा जालनाच्या वतीने देण्यात आले आहे. उपविभागीय अभियंता कार्यालयामार्फत परतूर पारडगाव रस्त्यावर बोगस काम करून कोट्यावधी रुपयांचे बिल सय्यद कंट्रक्शन एजन्सीला दिले त्याची सविस्तर चौकशी करून सय्यद कंट्रक्शन यांच्याकडून पैसे वसूल करण्यासाठी देण्यात आलेल्या बिलबाबत कारवाई करावी कारण सय्यद कंट्रक्शन एजन्सीने या रस्त्यावर खालचे मजबुतीकरण न करताच वरून डांबरीकरण करण्यात आले असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

WhatsApp Image 2021 06 30 at 4.45.37 PM

या कामासाठी दोन वेगवेगळे कार्यारंभ आदेश देण्यात आले, दि. 25 फेब्रुवारी 2019 रोजी, पारडगाव रस्ता रा.मा.224 कि.मी.63/500 ते 67/500,1कोटी,20 लाख,17 हाजार,563 रुपये खर्च केलेला दाखवून बोगस काम करून बिल पैसे उचलून घेतले,दि.13 नोव्हेंबर 2019 रोजी दुसरा कार्यारंभ आदेश देण्यात आला, या कार्यारंभ आदेश मध्ये जालना जिल्ह्यातील परतूर तालुक्यातील अहमदनगर शेवगाव पैठण पाचोड अंबड पाथरी रस्ता रा.मा. 61 कि.मी. 202/00 ते 208/00 पारडगाव परतुर रस्ता रामा 224 किमी 67/500 ते 70/ 500 या कार्यारंभ आदेशा मध्ये 3 कोटी,59 लाख,94 हाजार 84 खर्च केल्याचे दाखवले, परतुर ते पारडगाव रस्त्यावर एकूण,1कोटी,20 लाख + 3 कोटी,59 लाख, 4 कोटी 79 लाख रुपये खर्च केलेला दाखवून बिल पैसे उचलून घेतले, प्रत्यक्षात पाहणी केले असता या कामावर अंदाजे, 2 कोटी रुपये खर्च केले असतील, बाकी सय्यद कंट्रक्शन ने सा.बा. उपअभियंता परतुर श्री ठोंबरे यांना हाताशी धरून 2 कोटी 79 लाख रुपये बोगस कमाई करून घेतली, परतुर ते पारडगाव या रस्त्यावर अंदाजा पत्रकाप्रमाणे कोणतेही काम झाली नाही, म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाच्यावतीने मागणी करण्यात येत आहे.

author

    Related Articles

    प्रतिक्रिया व्यक्त करा

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत