समाजसेवक बाळासाहेब सानप यांनी कर्तव्यावर असणाऱ्या परिचरिकांना पुष्पगुच्छ व मिठाई देऊन केला सन्मान

समाजसेवक बाळासाहेब सानप यांनी कर्तव्यावर असणाऱ्या परिचरिकांना पुष्पगुच्छ व मिठाई देऊन केला सन्मान

बाळासाहेब सानप करतात कोरोणा काळात रुग्णांची चोवीस तास समाजसेवा

गेवराई : जागतिक परिचारिका दिनानिमित्त गेवराई येथील उपजिल्हा रुग्णालय येथे कोरोना रुग्ण सेवा समितीच्या वतीने सामाजिक कार्यकर्ते महेश दाभाडे व बाळासाहेब सानप यांच्या पुढाकारातून परिचारिका दिन साजरा करण्यात आला. यावेळी उपजिल्हा रुग्णालयात कर्तव्यावर असणाऱ्या सर्व परिचरिकांना तहसीलदार सचिन खाडे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.संजय कदम,एम.एस.चिंचोळे, डॉ.राजेश शिंदे यांच्यासह आदींच्या हस्ते गुलाब पुष्प व मिठाई देऊन गौरव करण्यात आला. दरम्यान कोरोना काळात आपला जीव धोक्यात घालून रुग्णांची सेवा करणाऱ्या सर्व परिचारिका यांचे आरोग्य विभागाचा कना असल्याची भावना तहसीलदार सचिन खाडे यांनी व्यक्त करत सर्व परिचारिका यांच्या कार्याचे कौतुक करत त्यांना शुभेच्छा दिल्या. हा उपक्रम गेवराई कोरोना रुग्ण सेवा समितीच्या वतीने सामाजिक कार्यकर्ते महेश दाभाडे व बाळासाहेब सानप यांनी आयोजित केला होता.बाळासाहेब सानप व कोरोणा रुग्ण समिती चोवीस तास रुग्ण सेवेत दाखल आहे तालुक्यातील नागरीकांनी घाबरुन न जाता थेट कोरोणा रुग्ण समिती ला संपर्क करुन आपली समस्या मांडावी असे आवाहण करण्यात आले आहे

author

    Related Articles

    प्रतिक्रिया व्यक्त करा

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत