समता महिला मंडळातर्फे योग शिबिराचे आयोजन

समता महिला मंडळातर्फे योग शिबिराचे आयोजन

yoga session organized by samta mahila mandal

नवी मुंबई – समता महिला मंडळ, सिवूड्सच्या वतीने मातृमिलन चर्च सेक्टर ४२ या ठिकाणी श्री अंबिका योग कुटीरच्या योग शिक्षकांच्या सहकार्याने २१ जून अंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आयोजित योग शिबीर यशस्वी पार पडले. शिबीर यशस्वी होण्यामागे विषेश सहकार्य करणा-या योग शिक्षिका हेमलता वैद्य, शालिनी नेरकर, फुलन शिंदे, रेखा तांबेवाघ यांनी साधकांना शुद्धीक्रीया आसन करून घेतले. तसेच योग व आहार याविषयी खूप चांगल्याप्रकारे माहिती साधकांना देण्यात आली. शिवसह्याद्री ऐक्यवर्धक सामाजिक सेवा संस्थेच्या कार्याध्यक्षा प्रा. वर्षाताई भोसले, प्रभाताई पाटील, मनिषाताई भोसले, अनिताताई निकम या देखील यावेळी उपस्थित होत्या.

कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी महिला मंडळाच्या रोशनी पाटील, ज्योती भालेराव, वर्षा बेलगिरी, वनिताताई पाटील, गिता वैती, गीतांजली जोशी, माया घाटगे,उषा धारवाड, सविता बो-हाडे यांचे सहकार्य लाभले. तसेच विभागातील महिलांनी योग शिबिरामध्ये उपस्थित राहून शिबिराचा लाभ घेतला. शिबिराला उपस्थित असणाऱ्या सर्व महिलांना गौतीचहाची रोपे, व तुळशीची रोपे भेट देण्यात आली. कार्यक्रमामध्ये उपस्थित सर्वांचेच समता महिला मंडळाच्या वतीने मनापासून आभार मानण्यात आले.

author

    Related Articles

    प्रतिक्रिया व्यक्त करा

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत