समतानायक बापूसाहेब उर्फ गंगाधर निळकंठ सहस्त्रबुद्धे वस्तीगृह, नागोठणे, ता. रोहा, जी. रायगड

बापूसाहेब उर्फ गं. नि. सहस्त्रबुद्धे वस्तीगृहात सर्व जाती-जामाती व धर्मीयांना मोफत प्रवेश सुरु !

 समतानायक बापूसाहेब उर्फ गंगाधर निळकंठ

सहस्त्रबुद्धे वस्तीगृह, नागोठणे, ता. रोहा, जी. रायगड

नागोठण्यातील

नवी मुंबई : डॉ नेल्सन मंडेला निवासी शासन मान्य  शाळेला ३० वर्ष पुर्ण झाली या निमित्ताने संस्थेच्या संचालक डॉ जी के डोंगरगावकर यांनी गैर विजाभज संवर्गातील सर्व जाती जमाती दरम्यान समतानायक बापूसाहेब उर्फ गंगाधर निळकंठ सहस्त्रबुद्धे वस्तीगृहात मोफत पहिली ते दहावी सेमी इंग्रजित शिकणाऱ्या विद्यार्थ्याला प्रवेश देण्याचे जाहीर केले आहे. गेल्या तीन दशक पासून  विजाभजसाठी रायगड जिल्ह्यातील ही  एकमेव शाळा आहे.  या शाळेत केवळ १२० विद्यार्थ्यांना जेवणाची सोय शासनाकडून केली जाते . त्यामुळे अन्य जातीजमाती व धर्माचे आर्थिक दृष्ट्या दुबळे आणि दऱ्याखोऱ्यातिल ग्रामीण आणि मुंबई महानगर प्रदेशातील झोपडपट्टीत राहणाऱ्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक गरज आणि शैक्षणिक वातावरण अभावी गळतीचे प्रमाण मोठे आहे म्हणून  संस्थेच्या संचालकाने सर्व जाती जमातीच्या विद्यार्थ्यांना नागोठणे येथील    समतानायक बापूसाहेब उर्फ गंगाधर निळकंठ सहस्त्रबुद्धे वस्तीगृहात मोफत प्रवेश देत असल्याचे डोंगरगावकर म्हणाले .  याविद्यार्थ्यांसाठी शासनाची कोणतीही मदत तथा अनुदान अथवा देणगी घेतली जाणार नाही असेही ते म्हणाले . संस्थेच्या सर्व सदस्याने प्रत्येकी ५ विद्यार्थ्यांचा खर्च आणि संस्थेतील प्रत्येक शिक्षकांनी एका विद्यार्थांचा खर्च करण्याचा निर्णय संस्थेने घेतल्याचे डोंगरगावकर म्हणाले .

शासन कर्ज बाजरी असल्यामुळे सर्व शालेय विद्यार्थ्यांना भोजन , शिक्षण,  निवास आणि सुविधा देण्यासाठी अनुदान मिळणे  हे जिकिरीचे झाले आहे याचा अभ्यास करून सामाजिक बांधिलकी तथा डॉ.  बाबासाहेब आंबेडकरांच्या समता संगरातील सहकारी बापूसाहेब उर्फ गंगाधर निळकंठ सहस्त्रबुद्धे  यांच्या नावाने हे वस्तीगृह सुरु केले आहे. असे डोंगरगावकर म्हणाले.  नागोठणे परिसरात इंग्रजी आरटीइ  अंर्तगत प्रवेश घेतलेल्या कोणत्याही संवर्गाच्या विद्यार्थ्यांची त्याच शिक्षण पूर्ण  होई पर्यंत या वस्तीगृहातील सुविधांचा लाभ दिला जाणार आहे. यासाठी कोकण आणि एमएमआरडी क्षेत्रातील गरजूंनी याचा लाभ घ्यावा

त्यासाठी नवी मुंबईतील सुप्परक भवन ,  प्लॉट नं. ५२ , से १९ खारघर नवी मुंबई येथील संपर्क कार्यालय अथवा  समतानायक बापूसाहेब उर्फ गंगाधर निळकंठ सहस्त्रबुद्धे वस्तीगृह , नीलंबरी भवन , नागोठणे रेल्वे स्थेशन जवळ , नागोठणे , ता रोहा ,जी रायगड येथे जल्म तारखेचा दाखल , फोटो सह पालकाने प्रत्येक्ष संपर्क करून प्रवेश घ्यावा असे आव्हान प्रा डॉ जी के डोंगरगावकर यांनी केले आहे .

 प्रा डॉ जी के डोंगरगावकर

      संचालक

   9930958025

author

    Related Articles

    प्रतिक्रिया व्यक्त करा

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत