संजीवनी इंग्लिश स्कुल जातेगाव घेणार पालकत्व…

संजीवनी इंग्लिश स्कुल जातेगाव घेणार पालकत्व…

Sanjeevani English School Jategaov will take custody...

IMG 20191003 WA0029 1

गेवराई प्रतिनिधी

गेवराई तालुक्यात तील जातेगाव येथील भूमिपुत्र डॉ रामेश्वर चव्हाण यांनी आदर्श उपक्रम राबवला आहे कोरोना महामारीत आई-वडीलांच्या मृत्यूनंतर निराधार झालेल्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक पालकत्वाची जबाबदारी संजीवनी इंग्लिश स्कुल जातेगाव शाळेने घेतली आहे या शाळेत इंग्रजी माध्यमाचे इयत्ता नर्सरी ते 7 वी पर्यंतचे शिक्षण पूर्णपणे मोफत देण्याचा निर्णय संस्थेचे अध्यक्ष डाॕ. चव्हाण रामेश्वर सर यांनी घेतला . कोरोना काळात आई- वडीलाचे छञ हरवलेल्या मुलांना शिक्षणासाठी संघर्ष करावा लागू नये म्हणून संस्थेच्या वतीने सामाजिक बांधिलकी समजून जातेगाव परिसरातील अनाथ मुलांना पूर्णपणे मोफत शिक्षण दिले जाणार असल्याने शाळेचे सर्व शिक्षक , पञकार दत्ता वाघमारे ,गोपाल भैय्या चव्हाण ,सुनिल मिसाळ , कालीदास काकडे ,भास्कर सोळंके व गावकऱ्यांनी डॉक्टर रामेश्वर चव्हाण यांचे कौतुक व अभिनंदन केले आहे

author

    Related Articles

    प्रतिक्रिया व्यक्त करा

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत