श्वसनासंबंधित आजार असलेल्या रुग्णांसाठी फायदेशीर ठरते पीस लिली, जाणून घ्या खासियत

श्वसनासंबंधित आजार असलेल्या रुग्णांसाठी फायदेशीर ठरते पीस लिली, जाणून घ्या खासियत

पीस लिलीच्या झाडामध्ये हवा शुद्ध करण्याचे विशेष गुण असतात. नासाच्या रिसर्चनुसार, पीस लिलीचे झाड घरात नैसर्गिक पद्धतीने हवा शुद्ध करण्याचे काम करते.

पीस लिलीच्या झाडामध्ये हवा शुद्ध करण्याचे विशेष गुण असतात. नासाच्या रिसर्चनुसार, पीस लिलीचे झाड घरात नैसर्गिक पद्धतीने हवा शुद्ध करण्याचे काम करते. मूळ स्वरुपातील अमेरिका आणि दक्षिण पूर्व एशिया मध्ये असलेल्या या झाडेचे वैज्ञानिक नाव पाथीफायलम असे आहे. तर पीस लिलीचे झाड लावण्यासाठी फारसे कष्ट सुद्धा घ्यावे लागत नाहीत. या झाडाची फुल वसंत ऋतु मध्ये येतात.

पीस लिलीच्या झाडामुळे हवेतील ट्राईक्लोरोइथीलीन, बेंजीन, जाइलीन, फॉर्मल्हेहाइड, टोल्यूनि आणि अमोनिया सारखे घातक घटकांना दूर करुन शुद्ध ऑक्सिजन मिळतो. पीस लिलिचे झाड कमीत कमी तीन ते चार वर्ष जगते. मात्र जर तुम्ही त्याची योग्य आणि उत्तम काळजी घेतल्यास ते पाच वर्षा पर्यंत टिकण्याची शक्यता अधिक असते. हवा 60 टक्के शुद्ध करण्यास सक्षमा या झाडामध्ये असते. याच कारणामुळे दमा आणि श्वसनासंबंधित आजार असलेल्या रुग्णांसाठी फायदेशीर ठरते. तर पीस लिलिच्या मुख्य: चार प्रजाती म्हणजे पीस लिली, कोबरा लिली, स्पेथ लिलि आणि पाथीफाइलम लिली या आहेत. याच्या फुलाच्या जवळजवळ 40 टक्के प्रजाती पहायला मिळतात.

पीसी लिली जर तुम्हाला घरी लावायची असल्यास तुमच्या आजूबाजूला असलेल्या नर्सरी मधून ते झाड खरेदी करु शकता. कालांतराने झाड अधिक बहरु लागते. त्यामध्ये काही नवी पालवी सुद्धा येते.पीस लिलिला अधिक उजेड लागत असल्याने तुमच्या घरातील उजेड ज्या ठिकाणी अधिक आहे तेथे ठेवा. त्यामुळे सुर्याची थेट किरणे लिलिच्या झाडावर पडली जातील. उन्हाळ्याच्या दिवसात एकाच त्याला पाणी घाला. क्लोरिनयुक्त पाणी झाडांना हानिकारक ठरु शकते. या व्यतिरिक्त वर्षातून एकदा झाडाला कंपोस्ट खत आणि उन्हाळ्यात दोन ते तीन वेळा ऑर्गेनिक लिक्विड फर्टीलाइजर टाका.

author

    Related Articles

    प्रतिक्रिया व्यक्त करा

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत