श्री विश्वकर्मा गणेश मंडळ मच्छिंद्र चिंचोली आदर्श उपक्रमातून गणेशोत्सव साजरा

WhatsApp Image 2021 09 22 at 6.10.54 PM

डीजे मुक्त करून टाळ-मृदंगाच्या गजरात शोभायात्रा काढून मिरवणूक संपन्न

दहा दिवस समाज उपयोगी उपक्रम राबवला

गेवराई प्रतिनिधी

WhatsApp Image 2021 09 22 at 6.10.55 PM 1

घनसावंगी तालुक्यातील मच्छिंद्र चिंचोली येथे दरवर्षी प्रमाणे याही वर्षी श्री विश्वकर्मा गणेश मंडळ कडुन टाळ-मृदंगाच्या गजरात गणरायाचे विसर्जन , मागील वर्षी देखील सांस्कृतिक कार्यक्रम डेकोरेशन मध्ये तालुक्यातून प्रथम क्रमांक मिळवलेला आहे ,भजन कीर्तन भारुड, हरिपाठ ,रांगोळी, स्पर्धा सांस्कृतिक कार्यक्रम देवीचा गाण्याचा कार्यक्रम असे विविध कार्यक्रम या मंडळात घेण्यात येत आहेत. ना डीजे ना बँड . सगळे वारकरी मंडळी श्रीनाथ महिला भजनी मंडळी , श्री विश्वकर्मा गणेश मंडळ, सहभागी झाले होते , महंत डॉक्टर योगीराज कैलासनाथजी महाराज यांच्या हस्ते आरती करण्यात आली उपक्रम यशस्वी करण्यासाठी अध्यक्ष मोहन पोपळघट ,उपाध्यक्ष महेश परब, कोषाध्यक्ष सुदाम भराटे ,हनुमान सातपुते, लक्ष्मण खोसे, पवन पोपळघट, संजय काळे ,भागवत पोपळघट, ज्ञानेश्वर पोपळघट ,विजय परब, रवी जगताप ,तुकाराम गायकवाड, संदीप मुळे ,कैलास देवडे, संदिप रनमळे,बाला पांढरे व सर्वच या मंडळासाठी मित्रपरिवार उपस्थित होते.

WhatsApp Image 2021 09 22 at 6.10.54 PM 1
administrator

    Related Articles

    प्रतिक्रिया व्यक्त करा

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत