श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्थेतर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन.

श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्थेतर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन.

Blood donation camp organized by Shri Chhatrapati Shivaji Maharaj Social Organization.

उरण दि 7(विठ्ठल ममताबादे)सध्या कोरोनाचा काळ चालू आहे. कोरोना काळात मृत्युच्या दारात उभ्या असलेल्या रुग्णांना प्लाज्मा तसेच रक्ताची खूपच गरज असते. उरण तालुक्यातील अनेक गरजू व्यक्तींना रक्त तसेच प्लाज्मा वेळेवर न भेटल्याची अनेक उदाहरणे आहेत. त्यामुळे गोरगरीब गरजू व्यक्तींना, रुग्णांना वेळेत रक्त तसेच प्लाज्मा मिळावा. उरण तालुक्यातील गोरगरीब लोकांचे जीव वाचावेत. त्यांना लगेच रक्त, प्लाज्मा मिळावेत या दृष्टीकोणातून श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्थेचे महाराष्ट्र राज्याचे कार्याध्यक्ष-पत्रकार विठ्ठल ममताबादे यांच्या संकल्पनेतून रविवार दि 11 जुलै 2021 रोजी कोप्रोली ते पिरकोन दरम्यान मुख्य रस्त्यालगत असलेल्या दत्त मंदिराच्या सभामंडपात पाणदिवे,उरण येथे सकाळी 10 ते दुपारी 3 या वेळेत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.सदर रक्तदान शिबीर कोरोना विषयक शासनाचे सर्व नियमांचे पालन करत संपन्न होणार आहे.

सदर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून उरणचे तहसीलदार भाऊसाहेब अंधारे,उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र बुधवंत हे उपस्थित राहणार आहेत. सदर रक्तदान शिबिरात रक्तदान करणाऱ्या रक्तदात्याला विशेष प्रमाणपत्र, सन्मानचिन्ह देऊन त्याचा गौरव केला जाणार आहे.तरी इच्छुक रक्तदात्यांनी श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सुदेश पाटील, कार्याध्यक्ष विठ्ठल ममताबादे, उपाध्यक्ष हेमंत पवार, सामाजिक कार्यकर्ते-सुनिल वर्तक यांच्याशी संपर्क साधावे असे आवाहन करण्यात आले आहे.

author

    Related Articles

    प्रतिक्रिया व्यक्त करा

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत