श्रीकृष्णाची दहीहंडी

श्रीकृष्णाची दहीहंडी

कृष्ण जयंतीला जन्माष्टमी म्हणून देखील ओळखले जाते. मथुरा नगरी मध्ये कृष्णाचा जन्म झाला. भगवान श्रीकृष्णाची ओळख सांगायची तर असं म्हणता येईल की मथुरा नगरीतील माखन चोर व सर्वांची मदत करणारा कृष्ण. यापलीकडे जाऊन प्रेरणा स्थान म्हणून देखील कृष्णाकडे पाहिले जाते. भारतीय सण-उत्सवात बाळ श्रीकृष्णाचा जन्म एक महत्त्वपूर्ण सण म्हणून ओळखला जातो तसेच विशेष करून हिंदू धर्मात मोठ्या उत्साहानं हा दिवस साजरा केला जातो.

या रात्री भजन, जागरण तसेच उपवास केले जातात. रासलीला, कृष्णलीला द्वारे नृत्य, नाटक सादर केले जाते. सध्या कोरोना विषाणूंमुळे अनेक निर्बंध लादले असले तरी संपूर्ण भारतात विविध ठिकाणी हा सण मोठ्या उत्साहात कोरोना गाईड लाईनचे पालन करून आज साजरा केला जाणार आहे .

जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशी दहीहंडी उत्सव साजरा करण्यात येतो. अनेक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने कार्यक्रम आखले जातात. अनेक बक्षिसं आणि स्पर्धेचे वातावरण सोबत नाचत, गाणं गात हा उत्सव आनंदात साजरा करण्यात येतो.

सर्वांना जन्माष्टमीच्या खुप शुभेच्छा.

सुमन गुप्ता, ९वी
साधना विद्यालय, सायन
सलाम बॉम्बे फाउंडेशन, मिडीया अकादमी

administrator

    Related Articles

    प्रतिक्रिया व्यक्त करा

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत