शिवसहयाद्री ऐक्यवर्धक सेवा संस्थेतर्फे विविध वाचनालयास ग्रंथ भेट

शिवसहयाद्री ऐक्यवर्धक सेवा संस्थेतर्फे विविध वाचनालयास ग्रंथ भेट

books gift to various libraries by shivsahyadri aikya vardhak sanstha

नवी मुंबई – १९ जून हा महारष्ट्र सरकारने वाचक दिवस जाहीर केला असल्याने शिवसहयाद्री ऐक्यवर्धक सेवा संस्थेतर्फे विविध वाचनालयामध्ये प्रत्येकी २५१ पुस्तकें भेट स्वरूपात देण्यात आली. १९ जून म्हणजेच वाचक दिनाचे औचित्य साधून सीवूड्समधील कवी कुसुमाग्रज वाचनालय, मायणी ता. खटाव जि. साताऱ्यातील नेहरू वाचनालय, निनाम पाडळीमधील श्री. ज्योतिर्लिंग वाचनालय, आस्था सामाजिक संस्था ऐरोली या वाचनालयांना पुस्तके देण्यात आली .

‘मागील काही काळापासून कोरोना महामारीने त्रस्त आहे जवळच्या माणसांना भेटणे अशक्य झाले आहे. मात्र पुस्तकें तुम्हाला कधीच एकटे टाकत नाहीत. गरज आहे तूम्ही एक पावूल पुस्तकांच्या दिशेने जावे,’ असा संदेश या कार्यबाबत संस्थेकडून देण्यात आला. नीलांबरी गाणू यांच्या घरातील ही दुर्मिळ पुस्तके शिवसह्याद्री ऐक्यवर्धक सामजिक संस्थेने विकत घेतली आणि विविध वाचनालयाना भेट दिली आहे. पुस्तक स्वीकारताना कुसुमाग्रज वाचनालयाचे जयवंत पाटील यांनी संस्थेचे कौतुक करत ऐक्यवर्धक या नावाप्रमाणे संस्था ऐक्य जपण्याचे प्रयत्न करीत असल्याचे मत देखील त्यांनी व्यक्त केले.

वेदांत जनसेवा ट्रस्टचे सुनील कुईगडे यांनी देखील संस्थेला शुभेच्छा देऊन या अभिनव उपक्रमाचे कौतुक केले. शिवसहयाद्री ऐक्यवर्धक सेवा संस्थेचे अध्यक्ष सुधाकर पाटील यांनी मनोगत व्यक्त करताना संस्थेची पार्श्वभूमी आणि विविध उपक्रम याविषयी माहिती सांगितली. संस्थेच्या कार्याध्यक्ष प्रा. वर्षा भोसले यांनी या कार्याला हातभार लावलेल्या सर्व कार्यकर्त्यांचे कौतुक केले. त्याचप्रमाणे ज्येष्ठ गझलकार अप्पा ठाकूर यांनी पाठवलेल्या शब्दरूपी शुभेच्छा देखील यावेळी वाचण्यात आल्या. या कार्यक्रमाला नवी मुंबईचे भूषण ललित पाठक, प्रवीण पाटील, संस्थेचे पदाधिकारी अण्णा साहेब निकम, कालिदास इंगवले, रवींद्र महाडिक , रत्नाकर कुदळे प्रभा पाटील,फुलंन शिंदे, मनीषा वाघ, रेखा तांबेवाघ , राजेश घाडगे यांनी उपस्थिती दर्शवली.

जागतिक महामारीच्या काळात पुस्तकें माणसाची साथ सोडत नाहीत आणि व्हॉट्सॲप विद्यापीठातील ज्ञान हे खरे असेलच असे नाही. पुस्तकें मात्र विश्वास निर्माण करतात. चला वाचूया , स्वतःला घडवूया असा संदेश संस्थेच्या कार्याध्यक्ष प्रा. वर्षा भोसले यांनी यावेळी दिला. तसेच प्रा. वर्षा भोसले यांनी  पुस्तके आणणे आणि त्याचे योग्य प्रकारे वाटप करण्याची मेहनत घेतली यासाठी सचिन कदम यांचे कौतुक करत अभिनंदन केले.

author

    Related Articles

    प्रतिक्रिया व्यक्त करा

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत