शिवसंपर्क अभियान अंतर्गत चाणजे जिल्हा परिषदेच्या केगाव व चाणजेच्या सभा संपन्न

शिवसंपर्क अभियान अंतर्गत चाणजे जिल्हा परिषदेच्या केगाव व चाणजेच्या सभा संपन्न

शिवसंपर्क अभियान अंतर्गत चाणजे जिल्हा परिषदेच्या केगाव व चाणजेच्या सभा संपन्न

विठ्ठल ममताबादे
उरण – शिवसेना पक्षप्रमुख तथा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री उध्दव साहेब ठाकरे यांच्या आदेशाने, रायगड जिल्हाप्रमुख तथा माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांच्या मार्गदर्शनाखाली उरण तालुका शिवसंपर्क अभियाना अंतर्गत चाणजे जिल्हा परिषदेच्या केगाव व चाणजे पंचायत गण विभागाच्या सभा म्हातवली व करंजा येथे संपन्न झाल्या.

सर्व पदाधिकारी व शिवसैनिकांना मार्गदर्शन करताना तालुकाप्रमुख संतोष ठाकूर यांनी पक्षप्रमुख यांना अभिप्रेत असलेल्या शिवसंपर्क अभियानाची माहिती दिली. शाखाप्रमुख व शिवसैनिकांनी आपल्या गावात आधारकार्ड, रेशन,रिक्षा चालकांचे रजिशट्रेशन, सरकारी योजनांची अमंलबजावणी याविषयी प्रभावीपणे कामे करावी असे सांगितले . बिजेपीने विमानतळ नामांतरा वरून केलेल्या कट कारस्थानाचा शिवसैनिकांनी समाचार घेतला. अखेर पर्यंत शिवसैनिक म्हणून राहिलेले दि.बा.पाटील यांच्या नावाचा गैरवापर करून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ बाबत बीजेपीने चालवलेल्या राजकारणाचा शिवसेनेने यावेळी समाचार घेतला . गाव तेथे शिवसेना शाखा व घर तेथे शिवसैनिक ही शिवसंपर्क अभियानात मोहीम राबवून संघटनेची बांधणी अधिक मजबूत करण्याचे शिवसेनेच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी आवाहन केले. या वेळी उपतालुकाप्रमुख जयवंत पाटील, उरण शहर संपर्कप्रमुख गणेश म्हात्रे, उपतालुका संघटक अमित भगत, युवासेना विधानसभा अधिकारी नितेश पाटील यांनीही मार्गदर्शन केले.

या मीटिंग साठी केगाव विभागप्रमुख एस के पुरो, चाणजे विभागप्रमुख हरेश्वर म्हात्रे, उपविभागप्रमुख रवी पाटील, चाणजे सरपंच मंगेश थळी तसेच दोन्ही विभागांतील शाखाप्रमुख, उपशाखाप्रमुख, आजी- माजी सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, सदस्या, युवासेना, महिला आघाडी पदाधिकारी व शिवसैनिक, उपस्थित होते.

author

    Related Articles

    प्रतिक्रिया व्यक्त करा

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत