शिल्पा शेट्टीचे पती आणि उद्योजक राज कुंद्रा यांना अटक

शिल्पा शेट्टीचे पती आणि उद्योजक राज कुंद्रा यांना अटक

Shilpa Shetty's husband and businessman Raj Kundra arrested

मुंबई: अभिनेत्री शिल्पा शेट्टीचे पती आणि उद्योजक राज कुंद्रा यांना मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली आहे. पॉर्न फिल्म्सची निर्मिती करून काही मोबाइल अॅपवर या फिल्म प्रदर्शित केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात राज कुंद्रा यांना अटक करण्यात आल्याची माहिती मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी एक पत्रक जारी करत दिली आहे. ( Shilpa Shetty Husband Raj Kundra Arrested )मढ बीचवरील एका बंगाल्यात फेब्रुवारी २०२१ मध्ये छापा टाकून मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने अश्लील चित्रपट आणि वेबसीरिज बनविणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश केला होता. त्यावेळी अभिनेत्री गहना वसिष्ठ हिच्यासह डझनभर आरोपींना अटक करण्यात आली होती. याच प्रकरणात राज कुंद्रा यांना आज गुन्हे शाखेने चौकशीसाठी बोलावले होते. चौकशीनंतर कुंद्रा यांना अटक करण्यात आली आहे. कुंद्रा हे या पॉर्न फिल्म निर्मिती आणि त्यांच्या प्रदर्शनात मुख्य सूत्रधार असल्याचे पुरावे आमच्याकडे असल्याचा दावा मुंबई पोलिसांनी केला आहे. या फिल्म आणि वेबसीरिजसाठी अर्थपुरवठा केल्याचा आरोपही कुंद्रा यांच्यावर आहे.दरम्यान, राज कुंद्रा यांचा पॉर्न फिल्म बनवणाऱ्या रॅकेटमध्ये सहभाग असल्याचे उघड झाल्याने आणि त्यांना अटक करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. याआधी आयपीएल सट्टेबाजी प्रकरणातही राज कुंद्रा हे अडकले होते. त्या प्रकरणात राजस्थान रॉयल्स संघाला कारवाईलाही सामोरे जावे लागले होते.

WhatsApp Image 2021 07 20 at 6.23.03 AM

राज कुंद्राविरोधात ठोस पुरावे असल्याचा दावा

वेबसीरिज, शॉर्ट फिल्म तसेच टीव्ही मालिकांमध्ये काम देतो असे सांगून तरुणींचे ‘पॉर्न’ व्हिडीओ बनविणारी प्रोडक्शन कंपनी चालविल्याच्या आरोपाखाली राज कुंद्रा यांना अटक करण्यात आली आहे. फेब्रुवारीत मढ बीचवरील एका बंगल्यात छापा टाकून पोलिसांनी पॉर्न प्रोडक्शन कंपनीचा पर्दाफाश केला होता. पोलिसांनी धाड टाकली त्यावेळी एका अश्लील व्हिडिओचे चित्रीकरण सुरु होते. पोलिसांनी बंगल्यातून बॉलिवूड क्षेत्राशी संबंधित अभिनेता, फॅशन डिझायनर आणि कॅमेरामन यांना अटक केली होती. हिंदी आणि तेलुगू सिनेमा आणि विशेष करून जाहिरातींमध्ये झळकणाऱ्या गहना वसिष्ठ हिचा सहभाग यामध्ये आढळल्यानंतर तिलाही अटक करण्यात आली होती. तेव्हापासून गुन्हे शाखा या प्रकरणाचा खोलात जाऊन तपास करीत होती. हे अश्लील चित्रपट आणि वेबसीरिज बनविण्यासाठी अर्थपुरवठा राज कुंद्रा याच्याकडून होत असल्याचा संशय पोलिसांना होता. याबाबतचे ठोस पुरावे हाती लागल्याने कुंद्रा याला अटक करीत असल्याचे मुंबई पोलिसांनी म्हटले आहे.

author

    Related Articles

    प्रतिक्रिया व्यक्त करा

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत