शिक्षक व विद्यार्थ्यांसाठी इंडिया Learning Week

शिक्षक व विद्यार्थ्यांसाठी इंडिया Learning Week

संपूर्ण जगासाठी २०२० हे वर्ष संघर्षाचं वर्ष होतं. कोविडच्या आकस्मिक हल्ल्याने सर्वच क्षेत्रांत अडचणी आल्या. शिक्षण क्षेत्रही यातून सुटलं नाही. विद्यार्थी, शिक्षक आणि पालक यांना याची सर्वात जास्त झळ बसली.


करोना संकटातील लॉकडाउनच्या असाधारण परिस्थितीत सीके संस्थेने महाराष्ट्रातील ६ जिल्ह्यांमध्ये ३४८ शिक्षकांसह व सुमारे ६८०० विद्यार्थ्यांसाठी अध्ययन व अध्यापनाची प्रक्रिया निरंतर सुरु ठेवण्यासाठी सातत्याने काम केले.
या काळात शिक्षकांसाठी नाविन्यपूर्ण पद्धतीने ऑनलाईन वेबिनार्स, कोचिंग सेशन्स असे विविध वैशिष्ट्यपूर्ण उपक्रम राबवून या सर्वांनाच एक वेगळी ऊर्जा मिळवून दिली.
याचा परिणाम असा दिसून आला की, लॉकडाउनच्या सुरुवातीला शिक्षण प्रवाहात विध्यार्थ्यांच्या सक्रिय सहभाग जो 35% होता तो आता सुमारे ८५% पर्यंत वाढला. यात भौतिक सुविधा उपलब्ध नसणाऱ्या व इतर अनेक समस्यांचा सामना करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या लक्षणीय आहे. शिक्षणासाठी धडपड करणारे हे सर्व विद्यार्थी, शिक्षक आणि पालक हे खऱ्या अर्थाने कोविड योद्धेच आहेत.
याच सर्व शिक्षक व त्यांच्या विद्यार्थ्यांनी लॉकडाउनच्या कालावधीत केलेल्या नाविन्यपूर्ण शैक्षणिक कामाचे ऑनलाइन प्रदर्शन सिके संस्था आणि जिल्ह्यातील विविध शासकीय यंत्रणा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केले आहे.
चला तर मग जॉइन होऊया India Learning Week मध्ये आणि या सर्वांच्या पंखाना बळ देऊया.

administrator

    Related Articles

    प्रतिक्रिया व्यक्त करा

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत