शिक्षक दिवस

शिक्षक दिवस

दरवर्षी ५ सप्टेंबर या दिवशी शिक्षक दिवस साजरा केला जातो. भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्म दिवसाच्या निमित्ताने शिक्षकांप्रती सन्मान प्रकट करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. गुरुंचे समाजात विशिष्ट स्थान असते. या दिवशी संपुर्ण भारतात सरकार द्वारे शिक्षकांना पुरस्कार देऊन सन्मानित केले जाते.

भविष्यातले डॉक्टर, शास्त्रज्ञ, इंजिनिअर, लेखक, शिक्षक आणि अनेक क्षेत्रांत प्रगती होण्यासाठी शिक्षकांची भुमिका महत्त्वाची ठरते. चांगले संस्कार, शिस्तीत राहणं तसेच योग्य शिक्षण घेऊन जगा समोर उभं राहण्यासाठी शिक्षकांना वंदन केले जाते.

कोरोना विषाणूंमुळे हा दिवस ऑनलाईन पद्धतीने साजरा केला जातोय. तसेच कॉलेज, शाळांमध्ये विविध उपक्रम राबविले जात आहेत. अनेक विद्यार्थी भेट वस्तू ग्रिटिंग कार्ड द्वारे शिक्षकांचे आभार व्यक्त करत आहेत. अशा प्रकारे घरी राहून स्वतःची काळजी घेऊन हा दिवस विद्यार्थी साजरा करत आहेत.

सर्वांना शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!!

वर्धन ताथवडे, ७ वी
साधना मराठी विद्यालय, सायन
सलाम बॉम्बे फाउंडेशन, मिडीया अकादमी

administrator

    Related Articles

    प्रतिक्रिया व्यक्त करा

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत