शाम्पू लावून केस धुतले तरी केश ऑईली होतात जाणून घ्या यावर उपाय…

शाम्पू लावून केस धुतले तरी केश ऑईली होतात जाणून घ्या यावर उपाय…

Even if you wash your hair with shampoo, your hair becomes oily. Find out the solution ...

आपल्याला दुसऱ्या दिवशी कुठेतरी जायचं असतं म्हणून आपण ऐनवेळी गडबड नको म्हणून आदल्या दिवशीच केस धुवून घेतो पण केस पुन्हा ऑईली आणि अगदी चिपकू चिपकू झालेले असतात.केसांना थोडा जरी पाऊस लागला तरी लगेचच केसांचे सेटींग बिघडून तर जातेच पण केस लगेचच ऑईलीही होऊन जातात. शाम्पू केल्यानंतर अनेक जणींचे केस पुन्हा तेल लावेपर्यंत मस्त सिल्की राहतात. पण काही जणींचे केस मात्र अगदी छान शाम्पू केला तरी दुसऱ्या दिवशी जणू काही केसांना तेल चोपडले आहे, असे दिसू लागतात

tomato 1533961496 4185372

१. टोमॅटोचा वापर
दोन मध्यम आकाराचे टोमॅटो घेऊन त्याचा रस काढावा. यामध्ये एक टेबलस्पून मुलतानी माती टाकावी आणि ही पेस्ट हळूवार हाताने केसांच्या मुळाशी लावावी. २० ते ३० मिनिटांनंतर केस स्वच्छ धुवून घ्यावेत.

premium dust tea 500x500 1

२. चहा पावडर
एका ग्लासभर पाण्यात १ टेबलस्पून चहा पावडर टाका आणि हे पाणी १० ते १५ मिनिटे उकळू द्या. पाणी थंड झाल्यावर ते गाळून घ्या आणि केसांच्या मुळाशी लावा. अर्ध्या तासाने केस धुवून घ्या.

Curry leaves22

३ कढीपत्ता आणि दही
२ वाटी भरून कढिपत्ता पाने आणि त्याच्या अर्धे म्हणजे एक वाटी दही घ्यावे. हे दोन्ही पदार्थ मिक्सरमध्ये टाकून त्याची बारीक पेस्ट करून घ्यावी. ही पेस्ट डोक्याच्या त्वचेला लावावी. त्यानंतर अर्ध्या तासाने केस धुवून टाकावे. यामुळे केसांचे अतिरिक्त तेल निघून जाईल आणि केस चमकदार होतील.

author

    Related Articles

    प्रतिक्रिया व्यक्त करा

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत