“शरीर सुदृढीसाठी हेल्थ क्लबची गरज” – सागर आप्पा धस

“शरीर सुदृढीसाठी हेल्थ क्लबची गरज” – सागर आप्पा धस

Youth leader Sagar Appa Dhas gives century visit to Anna Health Club in Kuslamb

कुसळंब येथील आण्णा हेल्थ क्लबला युवा नेते सागर आप्पा धस यांनी दिली सदीच्छा भेट

बीड प्रतिनिधी

बीड जिल्ह्यातील आष्टी आणि पाटोदा तालुक्यामुळे पैलवानाचा जिल्हा म्हणून ओळख ही माजी मंत्री तथा आमदार सुरेश आण्णा धस यांच्यामुळे ओळखले जात असून कुसळब येथे नागरिकांच्या शरिर सृष्टीसाठी आण्णा हेल्थ क्लबची स्थापना येथील जिल्हा परिषदेचे सदस्य माऊली आप्पा जरांगे यांनी उभारणी केल्यामुळे परिसरात नागरिकांना शरीराचे आरोग्याचे प्रश्न सुटले आहेत शरिरसृष्टी हीच मानवाला वरदान आहे, असे मत युवा नेते सागर आप्पा धस यांनी कुसळंब येथील अण्णा हेल्थ क्लब येथे भेट दिल्या नंतर चर्चा व गप्पागोष्टी करताना मत व्यक्त केले आहे.

पाटोदा तालुक्यातील कुसळंब जिल्हा परिषद सर्कल मध्ये सतत सामाजिक सांस्कृतिक आणि क्रीडा क्षेत्रात अग्रेसर असणारे जिल्हा परिषद सदस्य माऊली आप्पा जरांगे यांनी कुसळब या ठिकाणी अण्णा हेल्थ क्लब ची स्थापना करून नागरिकांना शरीर बनवण्यासाठी सुख सुविधा उपलब्ध केले आहेत. कुसळब येथील अण्णा हेल्थ क्लब ला युवा नेते सागर आप्पा धस यांनी भेट दिली. उपस्थित नागरिकांसोबत चर्चा करत गप्पागोष्टी करून हेल्थ क्लबची पाहणी केली आणि जि प सदस्य माऊली आप्पा जरांगे यांचे कौतुक करत नागरिकांना आवाहन केले की जीवन जगत असताना माणसाला शरीर सृष्टी महत्त्वाचे आहे त्यामुळे प्रत्येकाने व्यायाम योगासन आणि हेल्थ क्लब मध्ये जाऊन आपली शरिर श्रेष्ठी स्ट्रॉंग मजबूत करावी असे मत ही सागरा आप्पा धस यांनी उपस्थितांन सोबत चर्चा करताना व्यक्त केले आहे.

author

    Related Articles

    प्रतिक्रिया व्यक्त करा

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत