“व्यायामात शिस्त आणि सातत्य हीच आरोग्याची गुरुकिल्ली”-आयर्नमॅन खेळाडू श्री. मिनेश कोळी

“व्यायामात शिस्त आणि सातत्य हीच आरोग्याची गुरुकिल्ली”-आयर्नमॅन खेळाडू श्री. मिनेश कोळी

ठाण्यातील विद्या प्रसारक मंडळाच्या जोशी-बेडेकर कला आणि वाणिज्य स्वायत्त महाविद्यालयात रविवार दिनांक २९ ऑगस्ट २०२१ रोजी सकाळी अकरा वाजता मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त ‘राष्ट्रीय खेळ दिन’ जिमखाना आणि स्पोर्ट्स समितीच्या वतीने साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान प्राचार्या डॉ. सौ.सुचित्रा नाईक मॅडम यांनी भूषविले.  या प्रसंगी त्यांनी महाविद्यालातील खेळाडू विद्यार्थ्यांना  शुभेच्छा देऊन प्रोत्साहन पर मार्गदर्शन केले. यावेळी प्रमुख पाहुणे आयर्नमॅन आणि खेळाडू श्री.मिनेश कोळी म्हणाले की, खेळाडूंनी व्यायामातील  सातत्य आणि शिस्त अंगी बाळगली तर ते आरोग्याच्या उंच शिखरावर पोहोचू शकतात आणि निरोगी जीवन जगू शकतात. महामारी च्या काळात सुदृढ राहण्याच महत्त्व त्यांनी आपल्या भाषाणातून सांगितले. श्री. कोळी यांनी आजच्या करोना महामारी मध्ये सगळे जग थांबले असताना आपल्या वैयक्तिक जीवनात योग्य व्यायाम आणि आहारातून  आपले जीवन अधिक समृद्ध व आरोग्यदायी कसे करु शकतो याचा कानमंत्र दिला.
या कार्यक्रमासाठी उपप्राचार्य श्री. सुभाष शिंदे सर यांनी  विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले  की, आजच्या धकाधकीच्या जीवनात योग्य व्यायाम व योग्य आहार अतिशय उपयोगी असून महाविद्यालयीन जीवनात खेळावर देखील लक्ष केंद्रित करण्यास सांगितले. तसेच प्रमुख पाहुणे श्री. मिनेश कोळी यांना बोलण्यास अनुमोदन दिले.

त्याच बरोबर, प्रश्नोत्तराच्यावेळी  महाविद्यालयाचे ग्रंथपाल प्रा. नारायण बारसे आपले मनोगत व्यक्त करतांना  म्हणाले की, जर आपण हृदयासाठी काम केले तर हृदय आपल्यासाठी काम करेल.ते पुढे म्हणाले की, प्रत्येकानी स्वतःसाठी व कुटुंबासाठी दररोज एक तास तरी व्यायाम करुन आपले जीवन आरोग्यदायी    व सुखी करावे असे भावनिक आवाहन केले.
या कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात जिमखाना समितीचे अध्यक्ष डॉ. प्रमोद खराटे यांनी एकूणच जिमखान्याच्या कार्यपद्धतीचा आढावा घेऊन जिमखान्याचा वैभवशाली इतिहास थोडक्यात उलगडून सांगितला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. उर्मिला शेटवे यांनी केले, प्रमुख पाहुण्यांचा परिचय  प्रा.तुळशीराम जानकर यांनी करून दिला तर आभार प्रा.मनीष गोसावी यांनी मानले. सदर कार्यक्रम झूम आणि युट्युब या आभासी पटलवार यशस्वीरित्या संपन्न झाला तसेच कार्यक्रमाला उपप्राचार्या डॉ.प्रीयंवदा टोकेकर, उपप्राचार्य डॉ.महेश पाटील, उपप्राचार्या संगीता दिक्षित,पर्यवेक्षक त्रिवेणीप्रसाद शर्मा,सर्व समित्यांचे समन्वयक,प्राध्यापक, विद्यार्थी आणि खेळाडू  असे मिळून १०० जण उपस्थित होते.
या कार्यक्रमाच्या यशामध्ये जिमखान्याच्या क्रीडा संचालिका प्रा. रोहिणी डोंबे,प्रा.सुभाष काळे आणि  प्रा. यतीन पंडित यांचा मोठा हाथभार लाभला.
                                                      

author

    Related Articles

    प्रतिक्रिया व्यक्त करा

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत