वोडाफोन आयडियाने आपल्या प्लॅनमध्ये केले काही बदल

वोडाफोन आयडियाने आपल्या प्लॅनमध्ये केले काही बदल

भारत : देशातील प्रसिद्ध नेटवर्क प्रोव्हाइडर कंपनी म्हणजे Vodafone Idea ने २५९५ रुपयांच्या प्लॅनमध्ये काही बदल केले आहेत. या प्लॅनमध्ये आधी रोज २ जीबी डेटा मिळत होता. आता यात कमी करून रोज १.५ जीबी डेटा देण्याचे कंपनीने ठरवले आहे. या प्लॅनमध्ये वार्षिक स्ट्रिमिंग बेनिफिट्स मिळत आहे. आता २५९५ रुपयांच्या प्रीपेड प्लॅनमध्ये ३६५ दिवसांच्या वैधतेसोबत रोज १.५ जीबी डेटा दिला जाणार आहे.

या प्लॅनमध्ये आता Dinsey+Hotstar स्ट्रीमिंग हे बेनिफिट्स दिले जात आहेत. अन्य फायद्यात या प्लॅनमध्ये अनलिमिटेड व्हाइस कॉलिंग आणि SMS मिळतात. अतिरिक्त फायद्यात या प्लॅनमध्ये विकेंड डेटा रोलओवर बेनिफिट, अनलिमिटेड हाय स्पीड नाइट टाइम डेटा आणि Vi मूवीज आणि TVचे अॅक्सेस मिळत आहेत. 

Vodafone Idea चा अन्य २३९९ रुपयांचा वार्षिक प्लानमध्ये युजर्संना रोज १.५ जीबी डेटा दिला जातो. या प्लॅनमध्ये अनलिमिटे़ड व्हॉइस कॉलिंग आणि SMS मिळतात. अतिरिक्त फायदा म्हणून या प्लॅनमध्ये Zee5 Premium चे सब्सक्रिप्शन मिळत आहे.

Vodafone Idea चा १४९९ रुपयांच्या वार्षिक प्लॅनमध्ये युजर्संना २४ जीबी डेटा मिळतो. या प्लानमध्ये अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंग आणि SMS ची सुविधा मिळते. या प्लॅनमध्ये रोजच्या डेटासोबत Disney+Hotstar चे अॅक्सेस मिळत आहेत. 

Airtel चा २६९८ रुपयांचा प्लान
एअरटेलचा २६९८ रुपयांचा वार्षिक प्रीपेड प्लॅन आहे. युजर्संना यात रोज २ जीबी डेटा दिला जातो. याशिवाय, या प्लॅनमध्ये अनलिमिटेड व्हाइस कॉलिंग आणि रोज १०० SMS मिळतात. या प्लॅनची वैधता ३६५ दिवसांची आहे. या प्लॅनमध्ये Disney+Hotstar चे एक वर्षाचे व्हीआयपी सब्सक्रिप्शन मिळते. 

Jio चा २५९९ रुपयांचा प्लान
या वार्षिक प्लॅनमध्ये युजर्संना रोज २ जीबी डेटा दिला जातो. याशिवाय, या प्लॅनमध्ये अनलिमिटेड व्हाइस कॉलिंग आणि रोज १०० एसएमएस दिले जातात. या प्लॅनची वैधता ३६५ दिवसांची आहे. यात Disney+Hotstar चे एक वर्षासाठी व्हीआयपी सब्सक्रिप्शन दिले जाते.

author

    Related Articles

    प्रतिक्रिया व्यक्त करा

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत