वॉर्नर, स्लेटर भांडले? नंतर फेटाळले भांडणाचे वृत्त, रिसॉर्टमध्ये हाणामारीची चर्चा

वॉर्नर, स्लेटर भांडले? नंतर फेटाळले भांडणाचे वृत्त, रिसॉर्टमध्ये हाणामारीची चर्चा

‘डेली टेलिग्राफ’च्या वृत्तानुसार ताज कोरल रिसॉर्टमध्ये विलगीकरणा दरम्यान जोरदार वाद झाल्यानंतर वॉर्नर व स्लेटर यांच्यादरम्यान रात्री भांडण झाले. स्थगित झालेल्या आयपीएलच्या पर्वात सुरुवातीच्या सामन्यांमध्ये सनरायझर्सचे नेतृत्व करणारा वॉर्नर व ऑस्ट्रेलियाचा माजी सलामीवीर फलंदाज मायकल स्लेटर यांनी मात्र हे वृत्त फेटाळले.

माले : स्टार सलामीवीर फलंदाज डेव्हिड वॉर्नर व माजी क्रिकेटपटू व सध्या समालोचक असलेले मायकल स्लेटर यांनी येथे एका बारमध्ये मद्यधुंद अवस्थेत भांडण झाल्याचे वृत्त फेटाळले आहे. स्थगित झालेल्या इंडियन प्रीमियर लीगमध्ये सहभागी झालेले ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू मालेमध्ये काही दिवस थांबले आहे. तेथून ते मायदेशी जाणार आहेत.

‘डेली टेलिग्राफ’च्या वृत्तानुसार ताज कोरल रिसॉर्टमध्ये विलगीकरणा दरम्यान जोरदार वाद झाल्यानंतर वॉर्नर व स्लेटर यांच्यादरम्यान रात्री भांडण झाले. स्थगित झालेल्या आयपीएलच्या पर्वात सुरुवातीच्या सामन्यांमध्ये सनरायझर्सचे नेतृत्व करणारा वॉर्नर व ऑस्ट्रेलियाचा माजी सलामीवीर फलंदाज मायकल स्लेटर यांनी मात्र हे वृत्त फेटाळले. जैवसुरक्षित वातावरणात कोविड-१९ ची अनेक खेळाडूंना लागण झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर आयपीएल स्पर्धा अनिश्चित कालावधीसाठी स्थगित करण्यात आली.वॉर्नर म्हणाला, ‘असे काही घडले नाही. अशा प्रकारचे वृत्त तुम्हाला कुठून मिळते, याची मला कल्पना नाही. जोपर्यंत तुम्ही येथे नाहीत आणि तुम्ही ठोस पुरावा मिळत नाही तोपर्यंत तुम्ही काही लिहू शकत नाही, असे काही घडलेच नाही.’

डेवी चांगला मित्र –

स्लेटर‘फॉऱक्सस्पोर्ट्स डॉट कॉम डॉट एयू’ने स्लेटरच्या हवाल्याने म्हटले, ‘या चर्चेला काही अर्थ नाही. डेवी (वॉर्नर) व मी चांगले मित्र आहोत. आमच्यादरम्यान हाणामारीची शक्यता शून्य आहे.’

स्लेटरने केली होती पंतप्रधानांवरही टीका

दरम्यान, स्लेटर या कालावधीत प्रकाशझोतात राहिला. त्याने भारतातून ऑस्ट्रेलियात परतणाऱ्यांना सरकारने तुरुंगवास व दंडाची दिलेली धमकी अपमानजनक असल्याचे म्हटले होते. त्याचसोबत पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांच्यावर टीका केली होती. मॉरिसन यांनी स्लेटरची प्रतिक्रिया चुकीची असल्याचे म्हटले होते.

-वॉर्नर व स्लेटर ३९ ऑस्ट्रेलियन खेळाडू, प्रशिक्षक व सपोर्ट स्टाफच्या पथकाचे सदस्य आहेत. त्यांना गुरुवारी (दि. ६) चार्टर्ड विमानाने मालदीवला नेण्यात आले. त्याचा खर्च भारतीय क्रिकेट बोर्डने (बीसीसीआय) केला.

– आयपीएलमध्ये समालोचन करीत असलेला स्लेटर अन्य लोकांपूर्वीच भारत सोडून मालदीवला गेला होता. ऑस्ट्रेलियन सरकारने १५ मेपर्यंत भारतातून येणाऱ्या विमानांवर बंदी घातली आहे.

author

    Related Articles

    प्रतिक्रिया व्यक्त करा

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत