वेगवेगळ्या भाज्यांचे टॉपिंग केलेला चटपटीत पिझ्झा सॉस

वेगवेगळ्या भाज्यांचे टॉपिंग केलेला चटपटीत पिझ्झा सॉस

Spicy pizza sauce topped with different vegetables

हा पिझ्झा सॉस आठवडाभर चांगला राहू शकतो.ब्रेड स्लाईससोबत किंवा पोळीसोबत किंवा चटणी म्हणून तोंडी लावायलाही पिझ्झा सॉस मस्त लागतो.  लहान मुलांसकट त्यांचे आई- बाबा आणि काही प्रमाणात आजी- आजोबाही या पिझ्झाचे दिवाने आहेत पिझ्झा सॉसची ही झटपट होणारी रेसिपी नक्कीच करू शकेल.

header2 1586254167

पिझ्झा सॉस बनविण्यासाठी सगळ्यात आधी तुम्हाला पाहिजे असतील तेवढे ३- ४ टोमॅटो घ्या. त्याच्या देठाचा जो भाग आहे तो काढून टाका आणि हे सगळे टोमॅटो उकळत्या पाण्यात टाका. यानंतर टोमॅटो जरा मऊ पडले आणि त्याची सालं वेगळी होऊ लागली की टोमॅटो पाण्यातून काढून घ्या

यानंतर टोमॅटोचे लहान लहान तुकडे करा आणि जास्तीचे पाणी काढून टाका. यानंतर टोमॅटोचे तुकडे, लसूणाच्या पाकळ्या, गार्लिक पावडर, थोडेसे तिखट, ओरिगॅनो, पिझ्झा सिझनिंग आणि मीठ हे सगळे मिक्सरमधून बारीक करून घ्या. मिक्सरमधून काढताना वरून पुन्हा पाणी घालू नये. हा पिझ्झा सॉस एअर टाईट बाटलीमध्ये ठेवल्यास ७ ते ८ दिवस फ्रिजमध्ये ठेवू शकता. 

author

    Related Articles

    प्रतिक्रिया व्यक्त करा

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत