वृक्षारोपण करून गाव निसर्गरम्य…

वृक्षारोपण करून गाव निसर्गरम्य…

The village is scenic by planting trees ...

जातेगाव प्रतिनिधी

Trees For Rural Communites Amravati Maharashtra

गेवराई तालुक्यातील सुर्डी येथे गेवराई पंचायत समितीचे कर्तव्यदक्ष गटविकास अधिकारी आनुरुद्र सानप यांच्या उपस्थितीत ग्रामपंचायत अंतर्गत गावठाण जागेवर घन वृक्ष लागवड करण्यात आली. एक व्यक्ती तीन वृक्ष हा उपक्रम राबवत एक खड्डा तीन झाड वेगवेगळे जातीचे वृक्ष लावून निसर्गरम्य वातावरण तयार करण्याचे आव्हान गटविकास अधिकारी अनुरुद्र सानप यांनी केले आहे

सविस्तर असे की गेवराई तालुक्यातील सुर्डी येथे दि 24/6/2021 रोजी गेवराई पंचायत समितीचे कर्तव्यदक्ष गटविकास अधिकारी अनुरुद्र सानप यांच्या उपस्थितीत ग्रामपंचायत अंतर्गत घन वृक्ष लागवड गावठाण जागेवर करण्यात आली.सुर्डी येथील भुमीपुत्र जिल्हा परिषद सदस्य प्रतिनिधी पांडुरंग थडके यांच्या मार्गदर्शनाखाली सुर्डी चे सरपंच महादेव सोळंके, उपसरपंच नामदेव नवले, व सर्व ग्रामपंचायत सदस्य यांनी घन वृक्ष लागवडीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता जांभूळ वड पिंपळ, लिंब यासह निसर्गरम्य वातावरण देणारे वृक्ष लागवड गटविकास अधिकारी अनुरुद्र सानप यांच्या हस्ते करण्यात आली, उपस्थित ग्रामपंचायत सदस्य भागवत सोळुंके, जिजाभाऊ सोळुंके, कुंडलिक सोळुंके भीमराव तायडे, दत्ता सोळुंके, बाळू बेजगुडे, लक्ष्मण काकडे, श्रीमंत सोळुंके, खडके दिलीप, सोळुंके भाऊसाहेब सोळुंके अदी गावकरी उपस्थित होते

author

    Related Articles

    प्रतिक्रिया व्यक्त करा

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत