विश्व पशु कल्याण दिवस

विश्व पशु कल्याण दिवस

विश्व पशु कल्याण दिवस ४ ऑक्टोबर रोजी साजरा केला जातो. १९३१ पासून हा दिवस मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. हा दिवस साजरा करण्याचे उद्देश म्हणजे विलुप्त होणाऱ्या प्राण्यांच्या रक्षणासाठी तसेच मानवाशी प्राण्यांचे संबंध मजबूत करण्यासाठी या दिवसांचे खूप महत्त्व आहे. संपुर्ण जगात प्राण्यांविषयी प्रेम व्यक्त करता यावं यासाठी सुध्दा हा दिवस साजरा केला जातो. त्यामुळे या दिवसाला ‘पशु प्रेमी दिवस’ या नावाने देखील ओळखले जाते.

विविध प्राण्यांची माहिती विविध माध्यमातून लोकांपर्यंत पोहचले जाते. पशू रक्षण कसे करावे याचे प्रशिक्षण या दिवशी विविध उपक्रमांद्वारे लोकांपर्यंत माहिती पोहोचवली जाते. पशु कल्याणासाठी अंमलात असलेल्या कायद्यांची माहिती लोकांच्या जनजागृतीसाठी दिली जाते. अनेक शाळा तसेच कॉलेज मध्ये पशु कल्याण दिवसांचे महत्त्व पटवून देण्यात येते.

पशु कल्याण दिवस साजरा करताना आपल्या आजूबाजूला पशु संवर्धन करण्यासाठी आपण सगळ्यांनी मिळून प्रयत्न करणे गरजेचे आहे. कायदे व संरक्षण करताना पशुसंवर्धनासाठी योग्य ते वातावरण निर्माण करणे देखील गरजेचे आहे.

वर्धन ईश्वर ताथवडे, ७ वी
साधना मराठी विद्यालय, सायन
सलाम बॉम्बे फाउंडेशन, मिडीया अकादमी

author

    Related Articles

    प्रतिक्रिया व्यक्त करा

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत