विश्वात्मके देवे मंडळींचे सातत्यपूर्ण निसर्ग संवर्धन

विश्वात्मके देवे मंडळींचे सातत्यपूर्ण निसर्ग संवर्धन

कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन करुन आज पून्हा एकदा विश्वात्मके देवे साधक मंडळींनी पुण्यातील, बोपदेव घाट येवलेवाडी, येथे पांडूरंगाच्या नामघोषात, भक्तीभावाने ५०० पेक्षा आधिक वृक्षांची लागवड करुन आपले सातत्य कायम राखलं. यात केवळ भारतीय झाडांचा समावेश आहे कारण भारतीय असणारी पिंपळ, वड, कडूनिंब, जांभूळ, पिंपर, पळस, ही झाडे इतर अभारतीय झाडांपेक्षा जास्त अॉक्सीजन देतात आणि त्याचबरोबर औषधी गुणांनी युक्त आहेत. या मंडळींनी जाणलं आहे कि या विश्वाला अॉक्सीजनची गरज नितांत भासत राहणार आहे कारण माणूस काँक्रीटचे जंगल वाढवण्यासाठी नैसर्गिक जंगलांला अमर्याद हानी पोहोचवत आहे.

अॉक्सीजनचे स्त्रोत असणाऱ्या आणि फुकट अॉक्सीजन देणाऱ्या या भारतीय वृक्षांची लागवड आणि जतन करायला कोणी मागत नाही. विश्वात्मके देवे साधक मंडळीं गुरुवर्य हभप पुरुषोत्तम रायजाधव सर यांच्या देव, देश आणि धर्मासाठी प्राण घेतलं हाती या मार्गदर्शनाने, हे वृक्षलागवड आणि वृक्षसंवर्धनाचे कार्य मलाच करायचं आहे या निश्चयाने बरीच मंडळी या कार्यात हिरीरीने सामील होत आहेत. आज बोपदेव घाट पुणे येथेसुद्धा चिखली-निपाणी कोल्हापूर, सातारा, सांगली, मुंबई, नवी मुंबई आळंदी परीसरातून मंडळी जमा झाली आणि बघता बघता ५०० झाडं लावायचं आपले टार्गेट पूर्ण केलं.

b6d6604a fde1 4ea4 ae92 dc5fc7c29543

लहान मुलं, महीला आणि पुरुष या सर्वांनी सहभागी होऊन कार्य पूर्णत्वाला नेलं. फोटो इज मोट्टो या वृत्तीने झाडं लावली जातात, यात रोप, खड्डे आणि कष्ट वाया जातात म्हणून अशा मंडळींना नंतर ती झाडं वाढून जगवली पाहीजेत या दुरदृष्टीने प्रत्येकाने प्रयत्न केला पाहीजे अशी कळकळ रायजाधव सरांनी व्यक्त केली. “नगरेची रचावी। जलाशवे निर्मावी। महावने लावावी। नानाविधे।।” या ज्ञानेश्वर माऊलींच्या सुचनेचं तंतोतंत पालन करताना विश्वात्मके देवे मंडळी दिसतात. असं केलं तरच झाडं टिकतील, वाढतील आणि अॉक्सीजनचा स्त्रोत कायम राहील हे जाणून विश्वात्मके देवे मंडळींनी आतापर्यंत २५०००च्या वर झाडे लावून त्यांचा सांभाळ करत आहेत. झाडे लावा झाडे जगवा हे ब्रिदवाक्य आपण ऐकतो पण ते अंमलात आणणारी ही मंडळी निश्चितच समाजात एक आदर्श निर्माण करत आहेत. पूण्यातील, येवलेवाडीतले विद्यमान नगरसेवक श्री अनिलसाहेब विठ्ठल येवले, श्री विशालबापू कामठे, तसेच हभप निलेशभाऊ आणि गणेशभाऊ निंबाळकर यांच्या सहकार्यातून विश्वात्मके देवे मंडळींनी आज हा यज्ञ पुर्ण केला. समाजातील अशा सर्वांनी यात सामील झालं तर हे वैश्विक कार्य होऊन विश्वशांती निर्माण होईल.

-शुभम शंकर पेडामकर

author

    Related Articles

    प्रतिक्रिया व्यक्त करा

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत