विरारच्या कोविड रुग्णालयात आग

विरारच्या कोविड रुग्णालयात आग

विरार : विरार पश्चिम येथील विजय वल्लभ रुग्णालयातील अतिदक्षता विभागाला मध्यरात्रीनंतर आग लागली असून त्यामध्ये १३ रुग्णांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती पुढे आली आहे. रुग्णालयातील १७ रुग्ण या आगीत अडकले असून अग्निशमन दल आणि पोलिसांनी आगीवर नियंत्रण मिळवले आहे. आता रुग्णांना इतर ठिकाणी हलविण्याची सुरुवात केली आहे. नाशिक येथे ऑक्सिजनच्या गळतीमुळे २४ रुग्णांना आपले प्राण गमावल्याची घटना ताजी असतानाच विरारमध्ये झालेल्या घटनेनं हळहळ व्यक्त केली जात आहे.

author

    Related Articles

    प्रतिक्रिया व्यक्त करा

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत