विक्रोळी येथील गोदरेज एरिया मध्ये राहणारी नऊ वर्षांची राधा प्रशांत सावंत हिने मिळवले प्रथम स्थान

विक्रोळी येथील गोदरेज एरिया मध्ये राहणारी नऊ वर्षांची राधा प्रशांत सावंत हिने मिळवले प्रथम स्थान

मुंबई:- कराटे खेळात आज मुलांसोबत-मुली देखील कौतुकास्पद कामगिरी करत आहेत. राष्ट्रीय स्तरावरील गेम्स खेळत आज आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व करून वयोगट आठ मध्ये पहिल्या इंडो श्रीलंका व्हर्चुअल कराटे चॅम्पियनशिप २०२१ मध्ये सहभाग घेऊन पहिल्या क्रमांकाचे स्थान राधा प्रशांत सावंत हिने पटकावले आहे .

अत्यंत हुशार, ऍक्टिव्ह आणि स्मार्ट वर्क करणारी राधा असून तिच्या स्वभावात नम्रपणा नेहमी जाणवतो. आदर, दुसऱ्या प्रति प्रेम भावना आणि मदत करण्याची तयारी हे तिच्या अंगी असलेले गुण राधाला या यशाकडे घेऊन गेले आहेत असे तिचे पालक म्हणतात.

आई , वडील, बहीण आणि माई (आज्जी) च्या पाठिंब्यामुळे राधा हे यश संपादन करू शकली आहे असं म्हंटलं तरी वावगं ठरणार नाही कारण जेव्हा राधा सोबत बातचीत केली असता तिचं असं मत होतं की माझ्या यशाचे खरे मानकरी कोणी असतील तर माझे कुटुंब आहे. जेव्हा जेव्हा मला कोणत्याही गोष्टींची गरज पडली किंवा सहकार्य अपेक्षित होते तेव्हा माझे कुटुंब माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे होते. बाबांनी कधीच तू मुलगी आहेस किंवा तू हे करू शकणार नाही असं म्हंटलं नाही तर उलट तू हे कर हा विश्वास दिला. आईने माझ्या आहाराची काळजी घेतली, आज्जी माझे सर्व क्लासला येत होती. मोठी ताई सगळे हट्ट पुरवायची.

राधा ही जशी खेळात खेळाडूवृत्ती दाखवते अगदी त्याच पद्धतीने अभ्यासात देखील पारंगत आहे. तिला वाचन करायला खूप आवडते त्यात सुधा मूर्ती या तिच्या आवडीच्या लेखिका आहेत. त्यासोबत राधाला भविष्यात पुढे जाऊन रेड ब्लेड मिळवण्याची इच्छा आहे.

राधाला तिच्या उज्ज्वल भविष्यासाठी द महाराष्ट्र न्यूज कडून खूप खूप शुभेच्छा.

©️शुभम शंकर पेडामकर

administrator

    Related Articles

    प्रतिक्रिया व्यक्त करा

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत