वाहनांसाठी ‘कलर कोडिंग’ सुरू करण्यामागील नक्की कारण काय? एकदा क्लिक करून बघा;

वाहनांसाठी ‘कलर कोडिंग’ सुरू करण्यामागील नक्की कारण काय? एकदा क्लिक करून बघा;

मुंबई – मुंबईत कठोर निर्बंध लागू झाल्यानंतरही मुंबईतील वाहनांची पूर्वीइतकीच रहदारी रस्त्यावर सुरू असतानाचे दृश्य दिसत आहेत. शहरातील काही भागांत ठरल्याप्रमाने वाहतूक कोंडीही होत आहे. तसेच अनावश्यक किंवा परवानगी नसताना प्रवास करणाऱ्यांना आवरण्यासाठी पोलिसांनी काही रंगीत पास योजना सुरू केली आहे. त्या योजनेबाबत अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी, दुकानदारांबरोबरच सर्वसामान्य नागरिकांमध्ये गोंधळ निर्माण झाला आहे. त्यानिमित्ताने मुंबईचे सहपोलीस आयुक्त (कायदा व सुव्यवस्था)पाहणारे विश्वास नांगरे पाटील यांच्याशी केलेली बातचीत.

वाहनांसाठी ‘कलर कोडिंग’ सुरू करण्यामागील नक्की कारण काय ?

कठोर निर्बंधांमध्येही वाहने मोठय़ा संख्येने रस्त्यांवर उतरताना दिसत आहेत. प्रत्येक वाहन तपासून पुढे सोडणे हे अशक्य होते. वाहनांच्या गर्दीत अत्यावश्यक सेवा म्हणजेच आरोग्य सेवेतील डॉक्टर, रुग्णवाहिका, वैद्यकीय उपकरणे, प्राणवायू वाहून आणणाऱ्या वाहनांचा खोळंबा होऊ लागला, हे लक्षात आल्यावर प्रवासास मुभा असलेल्या सेवांची तीन रंगांमध्ये वर्गवारी करण्याची कल्पना पुढे आली आहे. ही योजना आमलांत आणल्यावर रस्त्यांवरून सुमारे ४० टक्के वाहनांची रहदारी कमी झाल्याचे निदर्शनास आले आहे. c ह्यांची कसून चौकशी, झाडाझडती घेणे सोपे झाले आहे. दुसरे असे की प्रत्येक गाडी थांबवून व्यक्तिश: चौकशी केल्याने दोन्ही बाजूंनी संसर्ग प्रसाराचा धोका होता तोही आता कमी झाला आहे.

रंगीत स्टीकर कोण देणार? आणीबाणीच्या परिस्थितीत प्रवास करणे भाग पडल्यास कोणता स्टीकर लावावा ?

हे स्टीकर घरच्या घरी तयार करता येतील. घरात या रंगाचा उपलब्ध कागदाचा वर्तुळ कापून घ्यावा आणि वाहनांच्या मागील किंवा पुढच्या बाजूस हे स्टिकर्स चिकटवणे अपेक्षित आहे. मुळात ही व्यवस्था निर्बंधांची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी असलेल्या पोलिसांच्या आणि अत्यावश्यक सेवेतील वाहनांच्या सोयीच्या दृष्टीने करण्यात आली आहे. हे स्टीकर वाहनांच्या नोंदणी क्रमांक पाटय़ांप्रमाणे प्रमाणित असावेत, ते पोलिसांकडूनच घ्यावेत, असे बंधन बिलकूल नाही. सर्वसामान्य नागरिक वैद्यकीय आणीबाणी किंवा अन्य अत्यावश्यक कारणांसाठी घराबाहेर पडल्यास, त्यांनी प्रवास केल्यास पोलीस कोणताही अडथळा आणणार नाहीत.

रंगीत स्टीकर लावलेल्या वाहनांसाठी काही विशेष व्यवस्था करण्यात आली आहे का ?

होय, लाल रंगाचा स्टीकर लावलेली वाहने महत्त्वाची असून त्यांना प्रवासात प्राधान्य देण्यासाठी ग्रीन कॉरिडॉरची व्यवस्था प्रायोगिक तत्त्वावर शहरातील काही मार्गावर करण्यात आली आहे.

बाहेरून मुंबईत येणाऱ्या वाहनांनाही हे रंगीत स्टीकर लावावे लागतील ?

निश्चितच, कलर कोडिंगबाबतचे आदेश फौजदारी दंड संहितेतील कलम १४४ नुसार मुंबईच्या हद्दीत लागू करण्यात आले आहेत. त्यामुळे अन्य शहरे, राज्यांतून मुंबईत येणाऱ्या वाहनांनी वर्गवारीनुसार हे रंगीत स्टीकर लावणे बंधनकारक आहे. तसे न केल्यास या वाहनांचा आणि प्रवाशांचा खोळंबा होऊ शकतो.

 रंगीत स्टीकरचा गैरफायदा घेणारे कसे ओळखाल?

कोणी प्रवास करावा, करू नये याबाबत नियम जारी करण्यात आले आहेत. हे नियम पाळण्याची जबाबदारी नागरिकांवरही आहे. मुभा असलेल्या कोणत्याही वर्गात नसताना रंगीत स्टीकर लावून प्रवास करणाऱ्यांवर फसवणुकीसह अन्य कायद्यांनुसार गुन्हा नोंदवला जाणार आहे. रंगीत स्टीकर नसलेल्या वाहनांची चौकशी होईलच, पण स्टीकर असलेल्या वाहनांचीही अधूनमधून चौकशी करण्यात येईल. गेल्या दोन दिवसांत काही ठिकाणी अशी चौकशी करण्यात आली. त्यातून आरोग्य सेवेशी संबंधित नसलेल्यांनी आपल्या वाहनावर लाल रंगाचा स्टीकर लावल्याचे आढळले तर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.

author

    Related Articles

    प्रतिक्रिया व्यक्त करा

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत