वारंवार गरम पाणी प्यायल्याने नुकसान होते

वारंवार गरम पाणी प्यायल्याने नुकसान होते

कोरोना कालावधीत या विषाणू पासून संरक्षण करण्यासाठी सर्व प्रकारचे घरगुती उपाय अवलंबविले जात आहे. परंतु कोणत्याही गोष्टीची अति केल्याने त्यापासून नुकसान संभवतात. कोरोनाकाळात लोक दिवसभर गरम पाणी पीत आहे. परंतु जास्त प्रमाणात गरम पाण्याचे सेवन केल्याने तोटे संभवतात. हे शरीराच्या विविध अवयवांवर तसेच आरोग्यासाठी हानिकारक आहे.

1 छाले होणे -बऱ्याचदा लोकांना असे वाटते की जास्त गरम पाणी प्यायल्याने आपल्याला कोरोना होणार नाही. तसेच अतिरिक्त चरबी देखील कमी होईल. तर असं काही नाही. आहारतज्ञ, डॉक्टर नेहमीच कोमट पाणी पिण्याचा सल्ला देतात. कोमट पाणी पिण्यामुळे पोटात जळजळ होते. शरीरात असलेले टिश्यू (ऊतक) अतिशय नाजूक असतात, ज्यामुळे जास्त गरम पाणी पिऊन छाले होतात.

2 रक्तदाबाचा धोका – जास्त गरम पाणी प्यायल्यामुळे रक्तावरही परिणाम होतो. ज्यामुळे आपल्या शरीरात रक्ताचे प्रमाण त्वरित वाढते आणि रक्तदाब जास्त होऊ लागतो. त्याचा परिणाम हृदयावर हीहोतो.

3 डोकेदुखी – कोरोनाची भीती इतकी जास्त बनली आहे की प्रत्येक गोष्टीत जास्त प्रमाणात होऊ लागल्या आहेत. म्हणून सकाळी फक्त एकदा कोमट पाणी प्या. वारंवार गरम पाणी पिल्याने डोकेदुखी होते, मेंदूच्या नसांवर सूज येते.

4 निद्रानाश -रात्रीदेखील गरम पाणी प्यायल्यावर शौचालयाची समस्या उद्भवू शकते. प्रत्येक वेळी टॉयलेट जावं लागू शकतं.या मुळे आपली झोप देखील अपूर्ण होऊ शकते.

5 किडनीला नुकसान संभवतो – किडनीमध्ये एक विशेष प्रकारची केपिलरी सिस्टम असते जे शरीरातील अतिरिक्त पाणी आणि विषारी पदार्थ बाहेर काढून टाकते. जास्त गरम पाणी आपल्या किडनीवर प्रभाव पाडतो. या मुळे किडनीच्या कार्य क्षमतेवर परिणाम होऊ शकतो.


author

    Related Articles

    प्रतिक्रिया व्यक्त करा

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत