वर्ल्ड बुक रेकॉर्ड पुरस्कार मतदारसंघातील जनतेला समर्पीत

वर्ल्ड बुक रेकॉर्ड पुरस्कार मतदारसंघातील जनतेला समर्पीत

world book record award dedicated to the people of the constituency

आ. नीलेश लंके यांना मुंबईत पुरस्कार प्रदान : अजित पवारांनीही केले कौतुक

पारनेर : प्रतिनिधी –

 कोरोना रूग्णांसाठी केलेल्या कामगिरीबददल मिळालेला लंडन येथील वर्ल्ड बुक रेकॉर्ड पुरस्कार आपण मतदारसंघातील विधवा, परित्यक्त्या, अपंग, डॉक्टर्स, आरोग्य कर्मचारी, आरोग्य मंदीरात काम करणारे कार्यकर्ते, राष्ट्रवादी काँग्रेस, नीलेश लंके प्रतिष्ठाणचे कार्यकर्ते तसेच मतदारसंघातील जनतेला समर्पीत करीत असल्याची प्रतिक्रिया आमदार नीलेश लंके यांनी गुरूवारी मुुंबईत पुरस्कार स्विकारल्यानंतर दिली. 

वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डस या संस्थेच्या महाराष्ट्राच्या अध्यक्षा श्रीमती फराह अहमद यांनी गुरूवारी दुपारी आ. लंके यांना हा पुरस्कार प्रदान केला. यावेळी बोलताना फराह अहमद म्हणाल्या कोरोना संकटात आ. लंके यांंनी केलेले काम कौतुकास्पद आहे. त्यांच्या या कार्याची संपूर्ण जगाने दखल घेतली. कोणत्याही माध्यमांवर नजर फिरविली की सर्वत्र आ. लंके यांचे भरीव काम दिसून येते. त्यांच्या या कार्याची आमच्या संस्थेने दखल घेत त्यांना या पुरस्काराने सन्मानीत करण्याचा निर्णय घेण्यात आला. या पुरस्कारासाठी मागविण्यात आलेल्या नावांमध्ये आ. लंके यांचेच नाव सर्व बाबतीत आघाडीवर राहिले. त्यामुळे पुरस्कार्थीची निवड करण्यास काहीही अडचणी आली नसल्याचे त्यांनी सांगितले.

पुरस्कार प्रदान केल्यानंतर आ. लंके म्हणाले, कोरोना संकट उभे राहिल्यानंतर पहिल्या लाटेमध्ये अडीच लाख वाटसरूंना भोजणाची व्यवस्था करण्यात आली. अनवानी चालणाऱ्या वाटसरूंना चपलांचे वितरण करण्यात आले. लॉकडाउन शिथील करण्यात आल्यानंतर परराज्यात, परजिल्हयात जाणाऱ्या नागरीकांसाठी निवाऱ्याची, भोजनाची तसेच त्यांच्या गावांना जाण्यासाठी वाहनांची व्यवस्था करण्यात आली. त्यानंतरच्या काळात कर्जुलेहर्या येथे शरदचंद्र पवार आरोग्य मंदीर सुरू करण्यात येऊन साडेपाच हजार रूग्णांवर मोफत उपचार करण्यात आले. दुसऱ्या लाटेमध्ये तब्बल साडेदहा रूग्णांवर उपचार करण्यात आले. विशेष म्हणजे रूग्णांना आधार देण्यात आल्याने एकाही रूग्णाचा आरोग्य मंदीरात मृत्यू झाला नाही. माजय हातून समाजासाठी हे चांगले काम झाले त्याची दखल लंडनच्या संस्थेने घेतल्याने या कामासाठी योगदान देणाऱ्या कार्यकर्त्यांचे, तेथे सेवा देणाऱ्या डॉक्टरांचे चिज झाले असेच म्हणावे लागेल हा पुरस्कार आपण मतदारसंघातील जनतेला समर्पीत करीत असल्याच्या भावना त्यांनी व्यक्त केल्या. 

यावेळी बाबाजी तरटे, अ‍ॅड. राहूल झावरे, डॉ. संतोष भुजबळ, बाळासाहेब खिलारी, मुकूंदा शिंदे, सत्यम निमसे, अमोल उगले, नितीन चिकणे, गोकुळ शिंदे, दादाभाउ रेेपाळे, भाउसाहेब डुकरे, बाजीराव कारखिले, दत्तात्रेय साळूंके, रोहिदास डेरेंगे, किरण म्हस्के, बाळासाहेब औटी, भाउसाहेब आहेर, संतोष नवले आदी यावेळी उपस्थित होते.

अजित पवारांनीही केले कौतुक

उपमुख्यमंत्री अजित पवार यांची आ. लंके यांनी भेट घेतल्यानंतर कोरोना काळात मिळालेल्या पुरस्काराबददल आनंद व्यक्त केला. आ. लंके यांनी कोरोना रूग्णांची सेवा करताना दिशादर्शक काम केले. त्याची लंडनच्या संस्थेने दखल घेउन सन्मान केल्याबददल पवार यांनी आ. लंके यांचे कौतुक केले.

 • शुभम शंकर पेडामकर
author

  Related Articles

  प्रतिक्रिया व्यक्त करा

  आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत