लोणावळा शहरात कोरोनाचे नवीन 32 रुग्ण

लोणावळा शहरात कोरोनाचे नवीन 32 रुग्ण

लोणावळा : लोणावळा शहरात आज खंडाळा विभागात सर्वांधिक 10 रुग्ण मिळून आले आहे तर नांगरगाव परिसरात 6, भांगरवाडी परिसरात 5, वलवण परिसरात 3, गावठाण व रायवुड परिसरात प्रत्येकी 2 तर बाजारपेठ, ठोंबरेवाडी, तुंगार्ली व भुशी गाव येथे प्रत्येकी 1 असे एकूण 32 कोरोना रुग्ण मिळून आले आहेत.

लोणावळा शहरातील कोरोनाची साखळी तोडण्यासाठी लोणावळा नगरपरिषदेच्या वतीने तीन दिवसांचा लाॅकडाऊन जाहिर केला आहे. याला व्यापारी वर्गाकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. लोणावळा शहरातील सर्व दुकाने आज बंद होती मात्र रस्त्यावर नागरिकांची वर्दळ पहायला मिळाली. लाॅकडाऊन हा नगरपरिषदेसाठी नसून नागरिकांच्या आरोग्यच्या हेतूने करण्यात आलेला आहे, याचे भान नागरिक कधी राखणार देवजाणे. मला काहीच होणार नाही या अर्हभावात फिरणार्‍यांनी एकदा लोणावळा शहरासह मावळ तालुका व पुणे जिल्ह्यात रुग्णालयांची काय अवस्था आहे, रुग्ण व त्यांचे नातेवाईक कोणत्या दिव्यातून जात आहेत याची माहिती घेऊन घराबाहेर पडावे असे म्हंणण्याची वेळ आली आहे.

महाराष्ट्र शासनाने संचारबंदीचा आदेश लागू केला आहे. या आदेशाचे नागरिकांनी काटेकोरपणे पालन करावे. मास्क वापरावा, सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करावे. कोरोनाची लक्षणे असल्यास आजार अंगावर न काढता तात्काळ कोरोना तपासणी करून घ्यावी. लोणावळा नगरपरिषदेच्या शाळा क्र. 1 याठिकाणी कोविड केअर सेंटर तयार करण्यात आले आहे. त्याच ठिकाणी कोरोना तपासणी केली जात आहे. तसेच लोणावळा नगरपरिषदेच्या निलकमल थिएटर समोरील गुजराती शाळा येथील शंकेश्वर रुग्णालय, खंडाळा प्राथमिक उपकेंद्र, कार्ला प्राथमिक आरोग्य केंद्र, कुरवंडे प्राथमिक आरोग्य उपकेंद्र व कुसगाव सिंहगड महाविद्यालय येथील ग्रामीण रुग्णालय याठिकाणी कोरोना लसीकरण मोहिम सुरू आहे. नागरिकांनी मोफत लसीकरण करून घ्यावे असे आवाहन करण्यात आले आहे.

author

    Related Articles

    प्रतिक्रिया व्यक्त करा

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत