लोकांना कोरोनाचा प्रतिबंध करण्यासाठी दरवर्षी लस घ्यावी लागू शकते

लोकांना कोरोनाचा प्रतिबंध करण्यासाठी दरवर्षी लस घ्यावी लागू शकते

People may need to be vaccinated every year to prevent corona

देशासह जगभरात कोरोना महामारीचे संकट दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. सध्या कोरोनाची दुसरी लाट ओसरताना दिसत आहे. तरीही याबाबत तज्ज्ञांनी चिंता व्यक्त केली असून काही दिवसानंतर कोरोना हा आजारही इन्फ्लूएंझासारखा होईल अशी शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. तसेच, लोकांना कोरोनाचा प्रतिबंध करण्यासाठी दरवर्षी लस घ्यावी लागू शकते, असे सांगण्यात आले आहे. सध्या देशात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसंबंधी तयारी सुरू आहे. जर लोकांनी कोरोना संबंधित नियमांचे पालन केले नाही, तर तिसरी लाट लवकरच येऊ शकते, असा इशारा त्यांनी दिला आहे

1613418364 4182 1

इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चमध्ये एपिडेमिओलॉजी अँड कम्युनिकेशनल डिसीजचे प्रमुख समीरन पांडा म्हणाले की, काही काळानंतर कोरोना एंडेमिक स्टेजवर पोहोचण्याची शक्यता आहे. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, काही काळानंतर कोरोनाचा व्हायरस इन्फ्लूएंझा सारखा एंडेमिक स्टेजवर पोहोचेल आणि त्यानंतर लोकांना दरवर्षी लस घ्यावी लागेल. तसेच आम्ही लसीमध्ये किरकोळ बदल करत राहतो. उपलब्ध लस कोरोनाच्या नवीन व्हेरिएंटविरुद्ध खूप प्रभावी आहेत, असे समीरन पांडा यांनी सांगितले.

आयसीएमआर येथे केलेल्या प्रयोगांमधून हे सिद्ध झाले आहे की सध्या भारतात असलेल्या लस नवीन व्हेरिएंटविरूद्ध देखील प्रभावी आहेत. तसेच, या दरम्यान स्तनपान करणार्‍या मातांना लस घेण्याचा सल्ला त्यांनी दिला आहे. लसीनंतर आईमध्ये तयार झालेल्या अँटीबॉडीज स्तनपान दरम्यान बाळापर्यंत पोहचतील. तसेच, त्या मुलासाठी खूप उपयुक्त ठरू शकतात, असे समीरन पांडा म्हणाले.

author

    Related Articles

    प्रतिक्रिया व्यक्त करा

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत