लॉक डाऊन मध्ये पुस्तकांचा आधार! – महापौर नरेश म्हस्के

लॉक डाऊन मध्ये पुस्तकांचा आधार! – महापौर नरेश म्हस्के
       वाचकांच्या मनात मूळ पुस्तकाबद्दल कुतूहल निर्माण करणारे आणि पुस्तक का वाचावे याची नवदृष्टी देणारे असे 'ऐसी अक्षरे रसिके' हे पुस्तक अनेक नवीन जुन्या पुस्तकांचा परीक्षण संग्रह  आहे. नवनवीन तसेच जुन्या गाजलेल्या पुस्तकांच्या शोधात असलेल्या वाचकांना अशा वाचनीय पुस्तकांची ओळख करून देणारे असे ' ऐसी अक्षरे रसिके ' हे पुस्तक आहे असे प्रतिपादन ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के यांनी केले. ठाणे महानगर पालिकेच्या सभागृहात झालेल्या या पुस्तक प्रकाशन प्रसंगी ते बोलत होते.
       शॉपिझेन प्रकाशन तर्फे प्रकाशित लेखिका प्रज्ञा पंडित यांच्या' ऐसी अक्षरे रसिके ' या पुस्तक परीक्षण संग्रहाचे प्रकाशन ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के यांच्या हस्ते झाले. त्यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले की ," कोणत्याही शहराची उंची ही तेथील इमारतीच्या उंचीवरून नाही तर तेथील वाचनालये, ग्रंथालये, अभ्यासिका आणि तेथे असणारी असंख्य पुस्तके आणि वाचकांची गर्दी यावरून ठरत असते. शहराची वैचारिक, सांस्कृतिक, शैक्षणिक श्रीमंतीत वाढ करण्याचे योगदान हे प्रत्येक पुस्तक, ग्रंथच करत असतात. उत्तम वाचन संस्कारांचा उपयोग प्रत्येक कार्य क्षेत्रात तुम्हाला होत असतो. समाज माध्यमात रुळणाऱ्या नवीन पिढीतही वाचनाची आवड निर्माण होणे गरजेचे आहे. या पार्श्वभूमीवर मूळ पुस्तकांचा सखोल आणि सर्वांगीण परिचय करून देणाऱ्या ' ऐसी अक्षरे रसिके ' अशा माहितीपूर्ण पुस्तकांना प्रोत्साहन देणे ही काळाची गरज आहे."

   "लेखिका प्रज्ञा पंडित यांच्या लेखनशैलीमुळे या पुस्तकांचा समीक्षणात्मक परिचय होतो,वाचकांची उत्सुकता वाढत राहते ,असेही त्यांनी सांगितले.

डॉक्टर विजया वाड, समाजसेविका सिंधुताई सपकाळ, राशीचक्रकार श्री शरद उपाध्ये,
संपदा जोगळेकर कुलकर्णी इत्यादी अनेक नामवंत दिग्गजांच्या पुस्तकांवर लेखिका प्रज्ञा पंडित यांनी
समीक्षणात्मक परीक्षण या पुस्तकात केले आहे.

administrator

  Related Articles

  प्रतिक्रिया व्यक्त करा

  आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत