लहान मुलांच्या दफनविधीसाठी जागा उपलब्ध करून देण्याची मागणी

लहान मुलांच्या दफनविधीसाठी जागा उपलब्ध करून देण्याची मागणी

Demand for providing space for burial of children

  • उरण दि 9(विठ्ठल ममताबादे )

नवघर गावात दफनभूमीची समस्या अधिकच बिकट होत चालली आहे.दफनभूमीसाठी पुरेशी योग्य जागा उपलब्ध नसल्याने लहान मुलांच्या अंत्यसंस्काराचा,दफनविधीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यामुळे लहान मुलांचा अंत्यविधी दफनभूमी साठी जागा उपलब्ध करून देण्याची मागणी ग्रामस्थ मंडळ अध्यक्ष जयप्रकाश नारायण पाटील यांनी पत्रव्यवहाराद्वारे सिडको, ग्रामपंचायतचे सरपंच, तहसीलदार, गटविकास अधिकारी, महावितरण कार्यालय यांच्याकडे केली आहे.

WhatsApp Image 2021 07 09 at 4.23.29 PM

नवघर गावात सिडकोने बांधलेल्या स्मशानालगत विद्युत डीपीचे काम चालू आहे. त्या ठिकाणी ग्रामपंचायत किंवा सिडकोकडून लहान मुलांचा दफनभूमीत जागा उपलब्ध करून न दिल्याने या ठिकाणी असलेल्या मोकळ्या जागेत नवघर गावातील ग्रामस्थांना दफन करावे लागत आहे.परंतु या ठिकाणी डीपी चे काम चालू आहे. तसेच सदर चालू असलेल्या डीपीची जागा बदलून दुसऱ्या जागेवर बांधावी किंवा नवघर ग्रामस्थांना लवकर लहान मुलांसाठी दफनभूमीची जागा उपलब्ध करून द्यावी. जोपर्यंत लहान मुलांना दफनभूमीसाठी जागा उपलब्ध होत नाही तोपर्यंत काम थांबविण्यात यावे अशी मागणी जयप्रकाश पाटील यांनी सरपंच,तहसीलदार, सिडको कार्यालय, महावितरण वीज कार्यालया यांच्याकडे पत्रव्यवहाराद्वारे केले आहे.


“बांधण्यात येणाऱ्या डीपीच्या जागेसाठी सिडकोकडे कोणत्याही प्रकारचे परवानगी घेण्यात आलेली नाही. ग्रामस्थांना विश्‍वासात न घेता ग्रामपंचायत मार्फत ते काम चालू आहे. त्यामुळे विद्युत डीपी दुसरीकडे लावण्यात यावी.नवघर गावातील ग्रामस्थांच्या भावना लक्षात घेऊन मुलांच्या दफनभूमीसाठी लगेच जागा उपलब्ध करून द्यावी.भविष्याचा विचार करता दफनभूमीची आवश्यकता भासणार आहे.त्यामुळे अगोदरच नियोजन करून ठेवणे गरजेचे आहे.ग्रामपंचायतीने आमच्या मागण्यांची दखल घेऊन ग्रामस्थांना न्याय द्यावा.” -जयप्रकाश पाटील (अध्यक्ष-ग्रामस्थ मंडळ,नवघर)

author

    Related Articles

    प्रतिक्रिया व्यक्त करा

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत